Assam CM Himanta Sarma Karnataka : कर्नाटकमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांआधी भारतीय जनता पार्टी दक्षिणेकडील या महत्त्वाच्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी कामाला लागली आहे. पक्षाला येथे प्रचारात कुठलीच कमी ठेवायची नाही. भाजपाने कर्नाटकात प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा सोमवारी येथील कनकगिरी येथे आयोजित केलेल्या प्रचार रॅलीत सहभागी झाले. भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला संबोधित करताना सर्मा यांनी कर्नाटकमध्ये भाजपाच्या हाती सत्ता द्या असं आवाहन केलं.

प्रचारसभेला संबोधित करताना सरमा म्हणाले की, “आम्हाला आता बाबरी मशीदीची गरज नाही, आम्हाला आता राम जन्मभूमी पाहिजे.” याशिवाय सरमा यांनी काँग्रेसवरदेखील हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी लंडनमधील चॅथम हाऊस येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भारतातली लोकशाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या कमेंटवरून सरमा यांनी राहुल यांना लक्ष्य केले. सरमा म्हणाले की, “वायनाडचे खासदार कधीच देशाचे पंतप्रधान बनू शकणार नाहीत.”

cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
arunachal cm among 10 BJP candidates elected unopposed in assembly election
अरुणाचलमध्ये भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध; मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्यांदा बिनविरोध

“…तोवर राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत”

सरमा म्हणाले की, “नरेंद्र मोदी आहेत तोवर राहुल गांधी पंतप्रधान होणे शक्य नाही. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला त्यांना सांगायचं आहे की नरेंद्र मोदी असेपर्यंत ते कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत.”

हे ही वाचा >> पोपट विकल्यानं युट्यूबरला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय? वाचा…

राहुल गांधीची भारत तोडो अशी भाषा : सरमा

आसामचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते हिमंत बिस्व सरमा एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले की, “काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’साठी कर्नाटकचा दौरा करतात आणि लंडनला जाऊन ‘भारत तोडो’ अशी भाषा करतात.” कर्नाटकमधील विजय संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या सरमा यांनी त्यांच्या भाषणात भगवान श्रीराम आणि श्री हनुमान यांचा अनेकदा उल्लेख केला. तसेच पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं.