आसाममधील कोक्राझारमध्ये शनिवारी एका मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी आरोपी रफिकुल इस्लाम याला अटक केली. दरम्यान, पोलिस कोठडीतून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर कोक्राझारमध्ये धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ.
पश्चिम आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना शनिवारी घडली. जिल्ह्यातील पथरघाट भागात ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपी रफिकुल इस्लाम याला अटक केली. दरम्यान, आरोपीने पोलिस कोठडीत असताना पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात आरोपी रफिकुल जखमी झाला आहे. या घटनेनंतर कोक्राझारमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला. कोक्राझार मधील विश्व हिंदू परिषदेने १२ तास कोक्राझार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात आल्याची माहिती कोक्राझारचे जिल्हाधिकारी पंकज चक्रवर्ती यांनी दिली.
कोक्राझारमध्ये या घटनेनंतर तणाव निर्माण झाला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. तसेच कोणतेही आंदोलन करण्यास बंदी आहे. रविवारी जिल्हा प्रशासनाने दोन्ही गटांतील संघटना, प्रतिष्ठित नागरिक तसेच नेत्यांना चर्चेसाठी बोलावून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते.
जिल्हाधिकारी चक्रवर्ती म्हणाले, “कोक्राझारमधील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. शातंता प्रस्थापित करण्यासाठी जे आवश्यक आहे ते आम्ही करत आहोत. तणाव ज्या भागांमध्ये जास्त आहे त्या भागांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. त्या भागातील रस्त्यांवर पथदिवे व सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.” दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी रफिकुल इस्लाम जखमी झाला आहे.
