संतापजनक! पॉर्न क्लिप पाहण्यास नकार दिल्याने सहा वर्षाच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या

पॉर्न पाहण्यास नकार दिल्याने सहा वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Student Gang Raped Boyfriend Thrashed By Robbers Near Mysore
(प्रातिनिधीक छायाचित्र)

पॉर्न पाहण्यास नकार दिल्याने सहा वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक म्हणजे या घटनेतील तिन्ही आरोपी हे अल्पवयीन असून ८ ते ११ या वयोगटातील आहेत. या सहा वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी बुधवारी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलं आणि एका आरोपीच्या वडिलांना अटक केली. ही धक्कादायक घटना आसामच्या नागाव जिल्ह्यातील कालीबोर पोलीस ठाण्याअंतर्गत उलुनीच्या बलीबटजवळ दगड-क्रशिंग मिलमध्ये घडली. मंगळवारी दगड-क्रशिंग मिलच्या शौचालयात मुलीचा मृतदेह सापडल्याने ही घटना उघडकीस आली. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर या घटनेचा तपास करण्यात आला.

नागाव जिल्हा पोलीस अधीक्षक आनंद मिश्रा यांनी सांगितले की, “तीन अल्पवयीन आरोपींनी सहा वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली आहे. या मुलीने पॉर्न क्लिप पाहण्यास नकार दिल्याने त्यांनी मुलीला दगडाने ठेचून मारले. अल्पयीन तिन्ही आरोपी पॉर्न पाहण्याचे व्यसनी होते आणि त्यांनीच हा भयंकर गुन्हा केला आहे. ११ वर्षांचा मुलगा पॉर्न पाहण्यासाठी त्याच्या वडिलांचा मोबाईल फोन वापरत होता. ही घटना खूप त्रासदायक असून आम्ही मोबाईल जप्त केला आहे. या सहा वर्षांच्या मुलीच्या हत्येचा उलगडा २४ तासांच्या आत झाला आहे.”

या अल्पवयीन मुलांनी मुलीवर लैंगिक अत्याचारही केले होते, असे तपासादरम्यान आढळून आले. मृत सहा वर्षीय मुलीने आरोप मुलांसोबत पॉर्न क्लिप  पाहण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी तिला दगडांनी ठेचून मारले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असे कालियाबोर उपविभागाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Assam girl murdered after she refused to watch porn hrc

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या