गुवाहाटी, कोची : आसाम, केरळम या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी विक्रमी मतदान झाले. आसाममध्ये ८५.३८, पुद्दुचेरीमध्ये ८९.८३ तर केरळममध्ये ७८.१२ टक्के मतदान झाले. आसाम व पुद्दुचेरीमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी सांगितले.
या तीनही प्रदेशातील मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान केले. आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागा अहेत. येथे २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत ८४.६७ टक्के मतदान झाले होते. यंदा हा विक्रम मोडीत निघाला.
पुद्दुचेरीमध्ये ८९.८३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. या केंद्रशासित प्रदेशात ३० जागा आहेत. येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्तेला इंडिया आघाडीने आव्हान दिले आहे. पुद्दुचेरीमध्ये २०११च्या निवडणुकीत ८६.१९ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाल्याने निवडणूक आयोगाने सांगितले.
केरळममध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा चार टक्क्यांनी वाढ झाली. २०२१ मध्ये ७४.०६ टक्के मतदारांनी हक्क बजावला होता. यंदा २.७१ कोटी मतदारांपैकी ७८.१२ टक्के मतदारांनी मतदान केले. पीआयबीच्या आकडेवारीनुसार, राज्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान आतापर्यंतची सर्वाधिक मतदानाची नोंद १९६० साली ८५.७२ टक्के होती.
महिला मतदारांची संख्या अधिक
आसाम, केरळम आणि पुद्दुचेरीमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक होती. आसाममध्ये ८४.८० टक्के पुरुषांनी, तर ८५.९६ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. केरळममध्ये पुरुषांचा मतदानातील सहभाग ७५.०१ टक्के होता, तर महिलांचा सहभाग ८०.८६ टक्के होता. पुद्दुचेरीमध्ये ८१.३३ टक्के महिलांच्या तुलनेत ८८.०९ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले.
आसाममध्ये हिंसाचारात ३० जखमी, सात अटकेत
आसाममध्ये गुरुवारी निवडणुकीसबंधित हिंसाचारात सुमारे ३० जण जखमी झाले असून सात जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती निवडणूक अधिकार्यांनी दिली. पाथरकांडी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कार्तिक सेना सिन्हा यांनी ईव्हीएम यंत्र तोडल्याने काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात २५ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अन्य काही ठिकाणीही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
आसाम, केरळम आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुका केवळ भारतासाठीच नव्हे तर लोकशाही जगासाठी ऐतिहासिक पाऊल आहे. या तीनही प्रदेशातील मतदारांचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करतो. – ज्ञानेश कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त
आसाम, पुद्दुचेरीत मतदानाचा विक्रम
* आसाम व केरळ या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी विक्रमी मतदान झाले.
* आसाममध्ये ८५.१० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. गेल्या म्हणजे २०२१ च्या निवडणुकीत ८२.०४ टक्के मतदान झाले होते. वाढीव मतदानाचा लाभ कोणाला याची चर्चा सुरू आहे. आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागा आहे.
* केरळममध्ये १४० जागांसाठी ७७.५० टक्के मतदान झाले. २०२१च्या तुलनेत ते जास्त आहे. येथे १९८७ चा ८० टक्क्यांचा विक्रम मोडता आला नाही.
* पुद्दुचेरीमध्ये ३० जागांसाठी ८९.२० टक्के मतदारांनी हक्क बजावला.
* आसाम, केरळममध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक होती. आसाममध्ये ८५.९६ टक्के तर केरळममध्ये ८०.८६ टक्के महिलांनी मतदान केले.
