इराकच्या पंतप्रधानांची हत्या करण्याचा प्रयत्न

दोन सशस्त्र ड्रोन विमाने बगदादच्या अतिसुरक्षित ग्रीन झोनमध्ये पाठवण्यात आली होती.

मुस्तफा अल काधिमी

बगदाद : सशस्त्र ड्रोनच्या माध्यमातून इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल काधिमी यांच्या घराला लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न रविवारी करण्यात आला, पण ते बचावले आहेत. गेल्या महिन्यातील संसदीय निवडणुकांचे निकाल इराण समर्थित बंडखोरांना मान्य नसून त्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. इराकच्या दोन अधिकाऱ्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, अल काधिमी यांचे सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. दोन सशस्त्र ड्रोन विमाने बगदादच्या अतिसुरक्षित ग्रीन झोनमध्ये पाठवण्यात आली होती.

 सरकारने म्हटले आहे,की स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन विमानाने अल काधिमी यांच्या घरावर हल्ला करून स्फोट करण्याचा प्रयत्न केला. बगदादच्या रहिवाशांना स्फोटाचे आवाज आले. ग्रीन झोन भागातून हे आवाज येत होते, तेथे सरकारी कार्यालये, परदेशी दूतावास आहेत. सुरक्षा दले आता सतर्क झाली असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून कुणी घेतलेली नाही. इराण समर्थित शिया बंडखोर व सुरक्षा दले यांच्या संघर्षांतून हा हल्ला झाला असावा. शिया बंडखोरांनी इराकमधील निवडणुकांचे निकाल फेटाळले असून  त्यांनी दोन तृतीयांश जागा गमावल्या आहेत.

ब्रुकिंग इन्स्टिटय़ूटचे रांज अलाद्दीन यांनी सांगितले की, अतिशय नाटय़मय अशा या घडामोडी असून शुक्रवारी निदर्शने करण्यात आली होती व त्यातील निदर्शकांनी ग्रीन झोनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. निदर्शक व सुरक्षा दले यांच्या गोळीबारात एक निदर्शक ठार झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Assassination attempt on iraqi prime minister mustafa al kadhimi zws

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या