पुर्वोत्तर राज्यातील मेघालय आणि नागालँड राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरूवात झाली. हे मतदान सांयकाळी चारपर्यंत सुरू राहील. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या ६०-६० जागा आहेत. पण दोन्ही ठिकाणी ५९ मतदारसंघातच निवडणूक होत आहे. मेघालयमध्ये दि. १८ फेब्रुवारी रोजी ईस्ट गारो हिल्स जिल्ह्यात आयइडी स्फोटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जोनाथन एन संगमा यांचा मृत्यू झाल्यामुळे विलियमनगर मतदारसंघातील निवडणूक रद्द झाली आहे. नागालँडमध्ये एनडीपीपी प्रमुख नीफियू रियो हे उत्तर अंगामी द्वितीय विधानसभा मतदारसंघातून अविरोध निवडून आले आहेत. दोन्ही राज्यासंह त्रिपुरातील मतमोजणी दि. ३ मार्च रोजी होणार आहे.

LIVE UPDATES

– नागालँड येथील मतदान केंद्रावर बॉम्बस्फोट

– दोन्ही राज्यात शांततेत मतदान सुरू आहे.

 

– अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

–  इव्हीएममधील बिघाड दूर केल्यानंतर शिलाँगमधील मतदान केंद्रावर मतदानास सुरूवात

–  शिलाँग येथील मॉडेल मतदान केंद्रावर इव्हीएममधील बिघाडामुळे मतदान थांबवले.