मोठी दुर्घटना! आफ्रिकन स्थलांतरितांची बोट समुद्रात बुडाली; ५७ जणांचा मृत्यू

गेल्या आठवड्यातली बोट बुडाल्याची ही दुसरी दुर्घटना आहे

Boat
इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही बोट मधेच बंद पडली आणि वातावरण खराब असल्याने ती बुडाली.

आफ्रिकन स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट काल लिबियाच्या समुद्रात बुडाली. या दुर्घटनेमध्ये किमान ५७ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. युरोपात चांगल्या जीवनशैलीसाठी स्थलांतरीत होणाऱ्या नागरिकांसोबतची ही नवी दुर्घटना समोर आली आहे.

दक्षिण किनारपट्टीला लागून असलेल्या खूममधून ही बोट रविवारी निघाली होती. या बोटीवर महिला आणि लहान मुलांसह ७५ जण होते. या दुर्घटनेत ज्या ५७ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी २० महिला असून २ लहान मुलं असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत संघटनेकडून देण्यात आली आहे. इंडिया टुडेने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या दुर्घटनेमधून १८ जणांना वाजवण्यात आलं असून त्यांना किनाऱ्याकडे पाठवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. या वाचलेल्यांपैकी काही जण नायजेरिया, घाना आणि गँबिया भागातले आहेत. त्यांनी सांगितलं की, इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही बोट मधेच बंद पडली आणि वातावरण खराब असल्याने ती बुडाली.

गेल्या आठवड्यातली बोट बुडाल्याची ही दुसरी दुर्घटना आहे. यापूर्वीही स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट बुडाली होती, ज्यात किमान २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: At least 57 dead as boat carrying african migrants capsizes off libya coast vsk