पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावरून भाजपा काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. दुसरीकडे पंजाब पोलिसांवर एसपीजीच्या ब्लू बुकचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज भलेही एसपीजी ब्लू बुकचे पालन न केल्याची चर्चा होत आहे, पण या अगोदर खुद्द पंतप्रधान मोदी देखील एसपीजीच्या रूल बुकच्या विरोधात गेलेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोष्ट २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीची आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले होते. येथे त्याने एसपीजीच्या ब्लू बुकच्या विरोधात जाऊन सिंगल इंजिन सी प्लेनने प्रवास केला होता. साबरमती नदीपासून उत्तर गुजरातमधील धरोई धरणापर्यंत त्यांनी हा प्रवास केला होता.

यावेळी पंतप्रधान मोदी भेटीचा आनंद घेत असताना त्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या एसपीजी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्रासाचे भाव दिसत होते. त्यांना त्यांच्या सहलीशी संबंधित जोखमीची काळजी होती. कारण सिंगल इंजिन असलेले सी प्लेन पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या मानकांनुसार नव्हते.

DGCA मार्गदर्शक तत्त्वे :

पंतप्रधान मोदींनी केवळ एसपीजी च्या नियमांविरुद्धच प्रवास केला नाही. तर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) च्या मार्गदर्शक सूचनांकडेही दुर्लक्ष केले. ज्यामध्ये मंत्री, एसपीजी सुरक्षा प्राप्त लोक आणि इतर मान्यवरांनी केवळ तेच विमान उडवावे, जे ऑपरेशनचे मानक पूर्ण करतात, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अशा उड्डाणांसाठी चांगल्या ऑपरेशनल क्षमतेसह मानक अनुपालन वैशिष्ट्यांसह ड्युअल-इंजिन विमाने वापरली जावीत. पण त्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी ज्या विमानाने प्रवास केला ते डीजीसीएच्या नियमांनुसार नव्हते.

ब्लू बुक म्हणजे काय :

पंतप्रधानांच्या कोणत्याही भेटीपूर्वी सुरक्षेचे नियोजन हा त्यांच्या सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग असतो. सुरक्षा व्यवस्थेमध्ये केंद्रीय एजन्सी आणि ज्या ठिकाणी दौरा आहे त्या राज्याच्या पोलीस दलाचा समावेश असतो . या संदर्भात, स्पेशल प्रोटेक्शन टीम (SPG) च्या ब्लू बुकमध्ये सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे विहित केलेली आहेत. या पुस्तकात व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेबाबत कोणते नियम पाळावेत याची माहिती लिहिली आहे. त्यानुसार पंतप्रधानांच्या सुरक्षेची रचना करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At that time prime minister modi had brought his own security in danger msr
First published on: 07-01-2022 at 13:43 IST