गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची पोलिसांच्या ताब्यात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी ( १५ एप्रिल ) रात्री त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात अतिक अहमद आणि अशर्रफ यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तीन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

लवलेश तिवारी, अरुण उर्फ कालिया मौर्य, सनी सिंह अशी ताब्यात घेतलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तिघा हल्लाखोरांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. तिघेही उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येतात. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

हेही वाचा : अतिकच्या मारेकऱ्यांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या का? प्रत्यक्षदर्शींचा मोठा दावा, म्हणाले…

सनी सिंहवर १५ गुन्हे दाखल

सनी सिंह हा हमीरपुर जिल्ह्यातील कुरार येथील राहणारा आहे. त्याच्यावर जवळपास १५ गुन्हे दाखल आहेत. सनीचा भाऊ पिंटूने सांगितलं की, १० वर्ष झालं तो घरी आला नाही. सनीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच, सनीच्या एका भावाचाही मृत्यू झाला आहे. तर, पिंटू हा चहाचे दुकान चालवतो.

अरुण मौर्यने पोलीस कर्मचाऱ्याचा केलाय खून

कासगंज येथील सोरों पोलीस ठाण्याच्या परिसरात अरुण मौर्य हा राहत होता. अरुणच्या आई-वडिलांचा १५ वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. तर, अरुणला दोन छोटे भाऊ आहेत, त्यांचं नाव धर्मेंद्र आणि आकाश आहे. अरुणने जीआरपी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याचा खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला.

हेही वाचा : अतिक अहमदच्या हत्येसाठी वापरलेल्या बंदुकीवर भारतात बंदी; ‘या’ देशात होते निर्मिती, किंमत तब्बल…

लवलेशने भोगली तुरुंगवासाची शिक्षा

लवलेश तिवारी हा कोतवाली येथील क्योतरा परिसरातील राहणार आहे. त्याच्या वडिलांनी सांगितलं, लवलेशसी त्यांचा काहीही संबंध नाही. तो कधीतरी घरी येत-जात होता. लवलेशवर ४ गुन्हे दाखल आहेत. लवलेशने एकाप्रकरणात एक महिना तुरुंगवासही भोगला आहे. दुसऱ्या प्रकरणात एका मुलीला चापट मारल्यामुळे त्याला दीड वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तिसरे प्रकरण दारूशी निगडीत आहे.