जगातील सातव्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप केले आहेत. अदानीप्रवर्तीत उद्योगसमूहाने दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचं अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या आपल्या एका अहवालात म्हटलं आहे. ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर अदानी समूहाला ४.२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अशातच अदाणी समूहाने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदाणी समूहाकडून ४१३ पानांचं स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलं आहे. त्यात लिहलं की, “‘हिंडेनबर्ग’चा अहवाल हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे. अदाणी समूहावरील लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. हा अहवाल म्हणजे अमेरिकास्थित कंपन्यांना आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी तयार केला आहे.”

हेही वाचा : अदानींच्या कर्जाचा बँकांकडून आढावा; काळजीचे कारण नाही – स्टेट बँक

“हा अहवाल भारतातील संस्थानांच्या स्वतंत्रता, अखंडता, गुणवत्ता आणि विकासावर केलेला हल्ला आहे. विश्वासार्हता आणि नैतिकता नसलेल्या संस्थेच्या अहवालामुळे आमच्या गुंतवणूकदारांवर परिणाम झाला आहे. ‘हिंडेनबर्ग’चा अहवाल ‘स्वतंत्र’ संशोधन केलेला नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप लावून बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे,” असं अदाणी समूहाने म्हटलं आहे.

हेही वाचा : Adani FPO: गौतम अदाणींनी सांगितलं एफपीओ गुंडाळण्यामागचं कारण; म्हणाले, “काल बाजारपेठेत…!”

“फसवणूक ही फसवणूक आहे, जरी…”

‘भारतावर ठरवून केलेला हल्ला’ अदाणी समूहाच्या या आरोपांनी ‘हिंडेनबर्ग’नं उत्तर दिलं आहे. “अदाणी समूहाच्या आरोपांशी आम्ही सहमत नाही. भारत एक लोकशाही आणि आगामी काळात महासत्ता होणारा देश आहे. पण, देशाची लूट करणाऱ्या अदाणी समूहाने तिरंग्या खाली भारताचे भविष्य रोखलं आहे. फसवणूक ही फसवणूक आहे. जरी ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने केलेली असली तरी,” असं ‘हिंडेनबर्ग’ने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on india say adani group after hindenburg report alleged fraud ssa
First published on: 30-01-2023 at 10:41 IST