Blast in Pakistan’s Karachi : पाकिस्तानच्या कराची विमानतळाबाहेर रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन चिनी कामगार ठार झाले आहेत, तर आठजण जखमी आहेत, असं वृत्त एपीने दिलं आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या गाड्या आणि धुराचे लोट व्हिडिओतून दिसत आहेत.

पोर्ट कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनी (प्रायव्हेट) लिमिटेडच्या चिनी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाल्याचे चीनी दूतावासाच्या निवेदनात म्हटले आहे. त्यात पाकिस्तानी जवानही मारले गेल्याचे म्हटले आहे.

Flight Bomb Threat to 85 Flights
Bomb Threat : आता ८५ विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी, एअर इंडियाच्या २० तर अकासाच्या २५ विमानांचा समावेश
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Loksatta explained on India China LAC agreement
चीनने सोडला दोन वादग्रस्त भूभागांवरील दावा? काय आहे भारत-चीन नवा समझोता?
Taipei Economic and Cultural Center in Mumbai
मुंबईत तैवानचं आर्थिक केंद्र; चीनने दर्शवला विरोध, काय आहेत कारणं?
Bulandshahr Cylinder Blast
Bulandshahr Cylinder Blast : घरात सिलिंडर फुटला; स्फोटाच्या धक्क्याने घर कोसळलं, एका महिलेसह ५ जण ठार
airline industry in chaos after 90 hoax bomb threats in a week
अन्वयार्थ : धोका, अफवा आणि उड्डाण!
A loud explosion was heard near the CRPF School in Rohini’s Sector 14,
Rohini Blast : दिल्लीतील स्फोटामागे खलिस्तानी समर्थक गट? टेलिग्राम चॅनेलवरील व्हिडिओमुळे खळबळ! पोलीस म्हणाले…
Delhi Blast Near CRPF School pti
दिल्लीतल्या स्फोटाचं कारण काय? घटनास्थळावरील ‘पांढऱ्या पावडर’मुळे फॉरेन्सिक टीम चकीत; दहशतवादी कटाचा संशय?

डॉनच्या वृत्तानुसार, “सीआयडीचे महासंचालक आसिफ एजाज शेख म्हणाले की, स्फोटाच्या स्वरूपाबाबत सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही.” स्थानिक टीव्ही स्टेशन जिओ न्यूजला प्रांतीय गृहमंत्री झिया उल हसन म्हणाले की, “हा स्फोट परदेशी लोकांना लक्ष्य करणारा हल्ला होता.” उपमहानिरीक्षक पूर्व अझफर महेसर म्हणाले की, “हे तेल टँकरचा स्फोट असल्यासारखे वाटत होते.”

चिनी निवेदनात या स्फोटाला “दहशतवादी हल्ला” असे संबोधण्यात आले आहे आणि या स्फोटाची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी ते पाकिस्तानसोबत काम करत असल्याचे म्हटले आहे. “पाकिस्तानमधील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावास या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतात (आणि) दोन्ही देशांतील निष्पाप बळींबद्दल तीव्र शोक व्यक्त करतात,” असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा > इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

“विमानतळाची इमारत आणि मालमत्ता सुरक्षित असताना विमानतळाजवळील मॉडेल कॉलनी रस्त्यावर स्फोट झाला होता. संबंधित संस्था स्फोट/अपघाताच्या कारणांचा तपास करत असताना विमानतळ प्रशासनाने अग्निशमन दलाची वाहने तात्काळ घटनास्थळी पाठवली” ,असे नागरी उड्डयन प्राधिकरणाचे प्रवक्ते सैफुल्ला यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

बीएलएने स्वीकारली जबाबदारी

दरम्यान, कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी फुटीरतावादी दहशतवादी गट बीएलएने स्वीकारली आहे.