श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेलं जात होतं. त्यावेळी हा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ला करणाऱ्या दोघांनी ते हिंदू सेनेचे सदस्य असल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आफताबला तुरुंगात नेत असताना झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी तारांबळ झाली. तलवारीने वार करत असलेल्या आरोपींना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आपली बंदुक काढून हवेत गोळी झाडण्याचाही इशारा दिला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही आरोपींनी तलवारींनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरुच ठेवले. अखेर गाडी चालकाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असताना गाडी पुढे नेली.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : आफताब तिहार जेलमध्ये आत्महत्या करु शकतो? अधिकाऱ्यांना भीती, कर्मचाऱ्यांना आदेश देत म्हणाले “त्याच्याजवळ…”

नेमकं काय झालं?

आफताबची श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी सकाळपासून दिल्लीत पॉलीग्राफी चाचणी सुरू होती. चाचणी झाल्यानंतर आफताबला सायंकाळी पुन्हा तुरुंगात नेण्यात येत होतं. त्याचवेळी तीन-चार जणांनी तलवार घेऊन येत गाडीवर हल्ला चढवला.

हेही वाचा : श्रद्धा हत्येप्रकरणी आफताबने कबुलीजबाब फिरवला तर? माजी DGP म्हणाल्या, “मी नेहमी सांगायचे…”

हल्ला करणारा आरोपी हल्ला करताना “आम्ही गुरुद्वारातून ही तलवार घेऊन आलो आहे. आफताबला दोन मिनिटे गाडीच्या बाहेर काढा. आम्ही त्याला मारून टाकू,” असं बोलतानाही आढळलं. आम्ही बंदुक आणि रायफलही आणू आणि आफताबला मारून टाकू, असंही हे आरोपी बोलताना दिसले.

आरोपींनी तलवारीने हल्ला केला असला तरी पोलिसांनी हल्लेखोरांना आफताबपर्यंत पोहचू दिलं नाही. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यात आफताबला कोणतीही दुखापत झालेली नाही.

हल्लेखोर काय म्हणाले?

हल्लानंतर एक आरोपी माध्यमांशी बोलताना म्हणाला, “जर आमच्या बहिणी आणि मुलीच सुरक्षित नसतील, तर आम्ही जगून काय करू? आम्ही आफताबला मारून टाकू. मी दोन मुलींचा बाप आहे. आम्ही तलवारने हल्लाच काय गोळीही मारू. आम्ही हिंदू सेनेचे सदस्य आहोत. आम्ही एकूण १० लोक आफताबवर हल्ला करण्यासाठी आलो होतो. मी कुलदीप ठाकूर हिंदू सेनेचा राज्याध्यक्ष आहे.”

हेही वाचा : Photos : दिल्लीत श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, देहरादूनमध्ये अनुपमाचे ७२ तुकडे; दोन्ही प्रकरणांमध्ये नेमकं काय साम्य?

आरोपींवर कारवाई करणं हे पोलिसांचं काम आहे, देशात कायदा आहे, तुम्ही कायदा हातात घेणार का? असा प्रश्न विचारला असता आरोपी म्हणाला, “पोलीस तर आरोपीला सुरक्षा देत आहेत. कायद्याने त्या मुलीला वाचवलं का? हे सर्वांना लक्ष्य करतात. दोन मिनिटे त्याला गाडीबाहेर काढा. आम्ही त्याला फाडून टाकू. त्याने कुणाच्या तरी मुलीला मारलं आहे. त्याने त्या मुलीचे ३५ तुकडे केले आहेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt to sword attack on shraddha walkar murder accused aftab poonawala in delhi pbs
First published on: 28-11-2022 at 19:35 IST