यती नरसिंहानंद यांना चिथावणीखोर भाषणं देणं महागात पडणार असल्याचं दिसतंय. अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी यती नरसिंहानंत यांचं एक वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं मान्य केलंय. तसेच नरसिंहानंदांविरोधात न्यायालयाची अवमाननाप्रकरणी खटला दाखल करण्यास परवानगी दिलीय. त्यामुळे आधीच चिथावणीखोर भाषणांप्रकरणी आरोपी असलेल्या नरसिंहानंदांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत राहणाऱ्या शाची नेल्ली यांनी नरसिंहानंद यांचं एक वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं सांगितलंय. तसेच या वक्तव्यप्रकरणी नरसिंहानंदांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला सुरू करण्याची परवानगी मागितली. यावर अटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी देखील हे वक्तव्य न्यायालयाचा अपमान करणारं असल्याचं मान्य करत खटला चालवण्यास परवानगी दिली. नरसिंहानंद चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत.

“सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवणाऱ्यांना कुत्र्याचं मरण येईल”

वेणुगोपाल यांनी या खटल्याला परवानगी देताना म्हटलं, “मी शाची नेल्ली यांनी पाठवलेलं पत्र वाचलं. तसेच नरसिंहानंद यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ देखील पाहिला. यात नरसिंहानंद यांनी ‘जे लोक लोक या व्यवस्थेत, राजकारण्यांवर, सर्वोच्च न्यायालयावर आणि सैन्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना कुत्र्याचं मरण येईल’, असं बोलत आहेत.”

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : वैवाहिक बलात्कार म्हणजे काय? हे प्रकरण नक्की न्यायालयामध्ये का चर्चेत आहे?

“नरसिंहानंदांचं वक्तव्य सामान्यांच्या मनात सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा हनन करणारं”

“नरसिंहानंदांचं वक्तव्य सामान्यांच्या मनात सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा हनन करणारं आहे. हा निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान कायदा कलम १५ नुसार गुन्हेगारी स्वरुपाचा खटला चालवण्याची परवानगी दिली जात आहे,” असंही वेणुगोपाल यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attorney general permit contempt proceedings against yati narsinghanand pbs
First published on: 22-01-2022 at 15:55 IST