Atul Subhash Suicide Case Update : बंगळुरूतील अभियांत्रिक अतुल सुभाषच्या आत्महत्येमुळे खळबळ माजली आहे. त्याने लिहिलेल्या २४ पानी आत्महत्येची चिठ्ठी आणि जवळपास तासाभराच्या व्हिडिओमध्ये अतुलने त्याच्यावर ओढावलेल्या आपबितीची माहिती दिली आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या सासूवरील दबाव वाढला होता. अखेर त्याच्या सासूने आणि मेव्हण्याने त्यांच्या राहत्या घरातून पळ काढला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास अतुलची सासू निशा सिंघानिया, मेव्हणा अनुराग सिंघानिया यांनी जौनपूरच्या खोवा मंडी भागातील त्यांच्या घरातून पलायन केले, असं एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी स्पष्ट केलं की त्यांना या प्रकरणाबाबत कर्नाटकातील पोलिसांशी कोणताही संवाद झालेला नाही.

Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
4 Naxalites killed 1 policeman martyred in encounter in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चकमक ४ नक्षली ठार, एक पोलीस शहीद
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?” संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल
Govind Pansare murder case no need to continue monitoring investigation of case says high court
पानसरे हत्या प्रकरण : प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरू ठेवायची आवश्यकत नाही

कोणतेही विशेष आदेश नाहीत

k

k

\

जौनपूरचे पोलीस अधीक्षक अजयपाल शर्मा टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, आम्हाला अद्याप या प्रकरणी बंगळुरूतील पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. या भागात नेहमीच पोलीस तैनात केले जातात. आरोपींबाबत कोणतेही विशेष आदेश नाहीत.”

हेही वाचा >> Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका

नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश नाहीत

कोतवली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मिथिलेश मिश्रा यांनी स्पष्ट केले की, निशा सिंघानियाला अटक करण्याचे, त्यांना घर सोडण्यापासून रोखण्यासाठी किंवा त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे कोणतेही निर्देश दिले गेले नाहीत.

अतुल सुभाषने आत्महत्या केल्यानंतर त्याचा भाऊ विकास कुमार याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्याने निशा सिंघानिया, निकिता सिंघानिया, अनुराग सिंघानिया आणि सुशील सिंघानिया यांची नावे दाखल केली आहे. यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा करण्यात आला आहे.

अतुल सुभाष यांची सुसाइड नोट इंडियन एक्सप्रेसच्या हाती लागली आहे. त्यांनी या नोटमध्ये शेवटच्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. पत्नी आणि तिच्या कुटुंबियातील कुणालाही माझ्या पार्थिवाच्या शेजारी फिरकू देऊ नका, अशी एक इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या सुसाइड नोटमध्ये त्यांनी पत्नीसह झालेल्या व्हॉट्सॲप संभाषणाचे स्क्रिनशॉटही जोडले आहेत. तसेच त्यांच्याशी निगडित न्यायालयीन खटले उत्तर प्रदेशहून बंगळुरूत हस्तांतरीत करण्यात यावी, असेही अतुल सुभाषने म्हटले.

‘माझ्या शेवटच्या इच्छा’ म्हणत १२ इच्छा व्यक्त केल्या

  • माझ्या सर्व न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे. जेणेकरून संपूर्ण देशाला माझ्या खटल्याबाबत आणि देशातील भयंकर न्यायव्यवस्थेबाबत माहिती मिळेल. तसेच महिला कायद्याचा कसा गैरवापर करतात, हेही दिसेल.
  • मी तयार केलेला व्हिडीओ आणि सुसाइड नोट पुरावा म्हणून ग्राह्य धरावा.
  • मला भीती आहे की, उत्तर प्रदेशच्या न्यायालयाचे न्यायाधीश पुराव्यांशी छेडछाड करून साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, त्यामुळे माझ्या खटल्यावर परिणाम होईल. माझ्या अनुभवानुसार उत्तर प्रदेशपेक्षा बंगळुरूमधील न्यायालय अधिक न्यायप्रिय आहेत. त्यामुळे माझी इच्छा आहे की, माझे सर्व खटले बंगळुरूथ हस्तांतरित करावेत.
  • माझ्या मुलाचा ताबा माझ्या पालकांकडे द्यावा. जेणेकरून ते त्याला चांगल्या संस्कारासह वाढवतील.
  • माझी पत्नी आणि तिच्या कुटुंबियांना माझ्या पार्थिवाजवळ येऊ देऊ नका.
  • माझा छळ करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत माझे अस्थी विसर्जन करू नका. जर न्यायालयाने भ्रष्ट न्यायाधीश, पत्नी आणि इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले तर माझ्या अस्थी न्यायालयाबाहेरील कोणत्याही गटारात वाहून टाका.
  • माझा आपल्या न्यायालयीन व्यवस्थेवर फारसा विश्वास नाही, तरीही माझा छळ करणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असे मला वाटते. असे झाले नाही तर माझ्या पत्नीसारख्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यात समाजातील इतर मुलांवर अशाच खोट्या केसेस दाखल होतील.
  • माझे आई-वडील, भाऊ यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत.
  • माझा छळ करणाऱ्या दृष्ट लोकांशी कोणतीही तडजोड करू नये, तसेच त्यांना कठोर शिक्षा द्यावी.
  • माझ्या पत्नीला शिक्षेपासून वाचण्यासाठी खटले मागे घेण्याची परवानगी देऊ नये.
  • माझी पत्नी आता सहानुभूती मिळविण्यासाठी माझ्या मुलाला न्यायालयात घेऊन येण्याची शक्यता आहे. कारण याआधी ती कधीही मुलाला घेऊन न्यायालयात आली नव्हती. कारण तिला माझी आणि मुलाची भेट होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे अशा नाटकीपणाला थारा देऊ नये.
  • जर यापुढेही पत्नी आणि तिच्या कुटुंबियांकडून छळ सुरूच राहिल्यास माझ्या आई-वडिलांनी न्यायालयाकडे औपचारिकपणे इच्छा मरणाची मागणी करावी. यापुढे देशात नवऱ्यासह त्याच्या आई-वडिलांनाही मारून टाकावे, जेणेकरून न्यायव्यवस्थेचे एक काळे युग प्रस्थापित करता येईल.

Story img Loader