scorecardresearch

Video : वायुवेगानं आलेल्या ऑडी कारने उडवली रिक्षा; भयंकर अपघात सीसीटीव्हीत कैद

रस्त्यावरून जात असताना भरधाव ऑडीने समोर असलेल्या रिक्षाला उडवलं… ही धडक इतकी भीषण रिक्षा खेळण्यातील वस्तूप्रमाणे दूर जाऊन आदळली….

Video : वायुवेगानं आलेल्या ऑडी कारने उडवली रिक्षा; भयंकर अपघात सीसीटीव्हीत कैद
रस्त्यावरून जात असताना भरधाव ऑडीने समोर असलेल्या रिक्षाला उडवलं… ही धडक इतकी भीषण रिक्षा खेळण्यातील वस्तूप्रमाणे दूर जाऊन आदळली….

बघणाऱ्याचा थरकाप उडावा अशा अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावरून वायुवेगाने जाणाऱ्या एका ऑडी कारने प्रवासी रिक्षाला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या धडकेनं रिक्षा एखाद्या खेळण्याप्रमाणे दूर जाऊन आदळला. हैदराबाद शहरातील सायबराबाद भागातील रस्त्यावर ही घटना घडली. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हैदराबादमधील सायबराबाद परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल जवळच्या रस्त्यावर ही घटना घडली. सोमवारी अर्थात २७ जून रोजी पहाटे घडली. पाऊस सुरू असताना रस्त्यावरून भरधाव निघालेल्या ऑडी कारने समोर असलेल्या रिक्षाला उडवलं. त्यानंतर कार पुढे निघून गेली. या भीषण अपघातात रिक्षातून प्रवास करत असलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला, तर रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे.

ऑडी कारच्या चालकाने मद्यप्राशन केलं होतं. पार्टीतून तो पुन्हा ज्युबिली हिल्सकडे निघाला होता. जात असतानाच त्याने रिक्षाला उडवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी ऑडी कारचालक सुजित आणि त्याचा मित्र आशिष यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुजितसह त्याचे वडील रघुनंदन रेड्डी आणि त्याचा मित्र आशिष याला हिट अॅण्ड रन गुन्ह्यात अटक केली आहे.

ही घटना कशी घडली हे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं. दारूच्या नशेत कारचा चालक सुजित वेगात कार चालवत होता. याच वेळी त्याने रिक्षाला पाठीमागून धडक दिली. त्यात कार उलटून आदळली आणि यात रिक्षाचालकासह प्रवाशी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत प्रवाशाचा मृत्यू झालेला होता, तर रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या