नासाच्या माहिती विश्लेषणातील दावा

यंदाचा म्हणजे ऑगस्ट २०१६ हा महिना गेल्या १३६ वर्षांत सर्वात उष्ण होता. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून नंतरच्या सलग अकरा महिन्यात तापमानाचे उच्चांक मोडले गेले असे नासाने म्हटले आहे. मोसमी तापमानाचे चक्र जुलै ते ऑगस्ट २०१६ दरम्यान बदलले होते व तापमान जास्त होते. आतापर्यंतचा सर्वात उष्ण ऑगस्ट या वर्षी नोंदला गेला. नासाच्या गोडार्ड इन्स्टिटय़ूट फॉर स्पेस स्टडीज या संस्थेने म्हटले आहे की, २०१४ च्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात तापमान ०.१६ अंशांनी जास्त होते.

गेल्या महिन्यात तापमान १९५१ ते १९८० या काळातील ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात तपमान ०.९८ अंश सेल्सियसने जास्त होते. जीआयएसएसचे संचालक गाविन श्मिडट यांनी सांगितले की, मासिक तापमान काही शंभरांशांनी बदलत असतात. दीर्घकालीन कल हे यात महत्त्वाचे असून त्यात ग्रहामध्ये होणारे बदल महत्त्वाचे आहेत.

ऑगस्ट महिन्यात तापमान जास्त होते हे तर खरेच पण गेले लागोपाठ ११ महिने हे तापमान जास्तच राहिले. ऑक्टोबर २०१५ पासूनच्या नोंदी यात गृहित आहेत. मासिक विश्लेषणानुसार ६३०० हवामान केंद्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे निष्कर्ष काढले आहेत. जहाजे व तरंगती उपकरणे यांच्या मदतीने सागराचे तपामान मोजले असून अंटाक्र्टिक संशोधन केंद्रानेही तापमानांचे मापन केले आहे.  आधुनिक जागतिक तापमानाची सर्वात जुनी नोंद १८८० मधील असली तरी ते तापमान पृथ्वीच्या विस्तीर्ण भागात नोंदलेले होते असे म्हणता येत नाही कारण तेव्हा तशा सुविधा फार कमी होत्या.