Avadh Ojha Sir Joins Aam Admi Party : यूपीएससी क्लासेससाठी प्रसिद्ध असणारे अवध ओझा सर यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत दिल्लीत एका कार्यक्रमामध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला. यावेळी मनीष सिसोदिया देखील उपस्थित होते. येत्या काही दिवसांत दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होणार असून, ते आपच्या तिकिटावर दिल्लीत निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अवध ओझा यांना पक्षात घेतल्याने विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, अशी आशा आम आदमी पक्षाला आहे. कारण ओझा यांची सोशल मीडियावर आणि तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता आहे. अनेकवेळा आपण अवध ओझा यांनी आपचे समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केल्याचे पाहिले असेल.

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
akhilesh yadav arvind kejriwal
इंडिया आघाडी विसर्जित होणार? केजरीवालांना पाठिंबा देण्यावरून दोन गट; अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितले….
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Prithviraj Chavan on delhi Government
Prithviraj Chavan : “दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकतील”, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; स्पष्टीकरण देत म्हणाले…
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करत आहेत?
Rajan Salvi Uddhav Thackeray Meet
Rajan Salvi : “मी नाराज होतो आणि आहे, माझ्या भावना…”, राजन साळवींचं उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मोठं विधान

कोण आहेत अवध ओझा?

अवध ओझा हे देशातील नावाजलेले शिक्षक आहेत. लोक त्यांना अवध ओझा सर या नावानेही ओळखतात. ते यूपीएससी विद्यार्थ्यांना इतिहास विषय शिकवतात. त्यांचा स्वतःचा कोचिंग क्लासही आहे. अवध ओझा हे उत्तर प्रदेशातील गोंडा येथील रहिवासी आहे. त्यांचे पूर्ण नाव अवध प्रताप ओझा आहे. त्यांचा जन्म ३ जुलै १९८४ रोजी झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव श्रीमाता प्रसाद ओझा आहे. अवध ओझा यांचे वडिल गोंडा येथे पोस्टमास्तर म्हणून काम करायचे. अवध ओझा यांची आई पेशाने वकील आहे. ओझा यांचे प्राथमिक शिक्षण गोंडा येथेच झाले. त्यानंतर त्यांनी गोंडा येथील फातिमा इंटर कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

हे ही वाचा : ISKCON च्या ५० हून अधिक सदस्यांना बांगलादेशने भारतात येण्यापासून का रोखलं? जाणून घ्या, सीमेवर नेमकं काय घडलं

निवडणूक न लढवण्याचा दावा

अवध ओझा यांचे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न होते. यासाठी दिल्लीला येत त्यांनी याची तयारी सुरू केली होती. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दिल्लीतच यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस सुरू केले. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी लॅलनटॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ते कधीही निवडणूक लढवणार नाहीत. राज्यसभेसाठी कोणताही प्रस्ताव आला तरी तो स्वीकारणार नाहीत. जनसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे. २०२० मध्ये अवध ओझा यांनी यूट्यूब चॅनल सुरू केले असून, त्याचे नाव RAY Avadh Ojha असे आहे. ओझा सर IQRA IAS चे संस्थापकही आहेत.

Story img Loader