श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील एका गावात शनिवारी हिमस्खलन झाले. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एक दिवसापूर्वी मध्यम ते मोठी हिमवृष्टी झाल्यानंतर बांदीपोरासह १२ जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी गुरेझच्या जुन्नियल गावाला हिमस्खलनाचा फटका बसला. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) शनिवारी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यासाठी हिमस्खलनाचा अधिक धोका व बांदीपोरा, बारामुल्ला, डोडा, गांदरबल, किश्तवाड, पूंछ, रामबन आणि रियासी जिल्ह्यांसाठी मध्यम धोक्याचा इशारा जारी केला. येत्या २४ तासांत कुपवाडा जिल्ह्यात दोन हजार मीटर उंचीवरील भागात हिमस्खलन होण्याची शक्यता आहे. बांदीपोरा, बारामुल्ला, डोडा, गांदरबल, किश्तवाड, पूंछ, रामबन आणि रियासी येथेही दोन हजार मीटरवर हिमस्खलनाचा धोका आहे. आगामी २४ तासांत अनंतनाग, कुलगाम आणि राजौरी जिल्ह्यांते २,००० मीटरपेक्षा उंच भागात कमी धोक्याचे हिमस्खलन होण्याची शक्यता आहे.

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Water supply by tanker to 61 villages in Jat and Atpadi talukas of the district sangli
सांगली: सव्वा लाख लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर

नागरिकांना सूचना

लोकांना खबरदारीचा व हिमस्खलन प्रवण भागात जाण्याचे टाळण्याचा सल्ला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे. गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग येथे गुरुवारी एका बांधकाम कंपनीच्या कामाच्या ठिकाणी हिमस्खलनामुळे किश्तवाडमधील दोन मजुरांचा मृत्यू झाला होता.