Ram Mandir Ayodhya experience and summer travel update by German visitor : अयोध्येतील भव्य राम मंदिराचे आकर्षण आता सातासमुद्रापार पोहोचले असून, जर्मनीचा तरुण भाविक अंजनेय याने नुकतेच रामलल्लाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे तेज पाहून थक्क झालेल्या या तरुणाने अयोध्येतील वातावरणाबद्दल आणि विशेषतः तेथील कडक उन्हाबद्दल आपला अनुभव मांडला आहे.
राम मंदिरात येणाऱ्या भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत जातेय. देशभरातली विविध कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्येच्या राम मंदिरात दर्शनाकरता येतात. केवळ देशभरातीलच नव्हे तर विदेशी नागरिकही येत असतात. आता एक मुलगा सोशल मीडियावर ट्रेंड होत असून तो मूळचा जर्मनचा आहे. त्यानेही अयोध्येच्या राम मंदिराला भेट दिली.
इथं खूप उकाडा आहे
या छोट्या रामभक्ताचं नाव अंजनेय नाव असून तो मुळचा जर्मनचा आहे. भारतात आल्यानंतर तो अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाकरता गेला होता. त्यावेळी एएनआयने त्याच्याशी संवाद साधला. तो म्हणाला, राम मंदिरातील माझा अनुभव चांगला आहे. पण इथं खूप उकाडा आहे.
पण भारतात उकाडा असला तरीही तो सहन करता येईल, असंही तो म्हणाला. याबाबत तो म्हणाला की, भारतात उकाडा असला तरीही मी उन्हाळा सहन करू शकतो. तसंच हे मंदिर अत्यंत चांगलं आहे. रामाची मूर्ती पाहणं हा आमचा चांगला अनुभव आहे.
