नवी दिल्ली : ‘बोईंग बी ७७७’ प्रकारातील भारतातून अमेरिकेला जाणारी सहा विमाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एअर इंडियाकडून घेण्यात आला. या विमानांच्या निर्मात्याने ही विमाने चालवण्यास कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर एअर इंडियाकडून हा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-अमेरिका मार्गावरील आठ विमाने रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियाने बुधवारी घेतला होता. उत्तर अमेरिकेत ५जी इंटरनेटमुळे या विमानांच्या रेडिओ अल्टिमीटरमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. अमेरिकेच्या केंद्रीय विमान वाहतूक प्रशासनाने गुरुवारी सांगितले की, ‘बोईंग बी ७७७’सह काही प्रकारच्या विमानांमध्ये विशिष्ट प्रकारचे रेडिओ अल्टिमीटर बसवण्यात आले असून ५जी सेवेमुळे त्यांच्यावर परिणाम होणार नाही. अमेरिकेच्या स्पष्टीकरणानंतर एअर इंडियाने विमाने रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला. ‘बोईंग बी ७७७’प्रकारातील पहिले विमान गुरुवारी सकाळी न्यूयॉर्कला रवाना झाले. त्यानंतर शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्कोला विमाने रवाना झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: B 777 aircraft resumed six flights to the united states akp
First published on: 21-01-2022 at 00:18 IST