लॉकडाउन दरम्यान चर्चेत आलेल्या ‘बाबा का ढाबा’ आणि त्याचे मालक कांता प्रसाद यांनी फूड ब्लॉगर गौरव वासनशी झालेल्या वादाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरच्या ‘बाबा का ढाबा’ ची कथा देशभर प्रसिद्ध झाली. ज्यामध्ये रस्त्यावर छोटा ढाबा चालविणारे कांता प्रसाद रातोरात प्रसिद्ध झाले कारण एका फूड ब्लॉगरने त्यांचा एक व्हिडिओ बनविला होता. व्हिडिओ मध्ये ८० वर्षाचे बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद रडत होते. लोकं ढाब्यावर खायला येत नाहीत, माझे दुकान चालत नाही, असे म्हणत ते व्हिडिओत रडत होते.

काही वेळातचं कांता प्रसाद यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. त्यांचा संघर्ष त्या व्हिडिओमध्ये दिसत होता. त्यामुळे ढाब्यावर लोकांनी एकचं गर्दी केली. लोकांनी मोकळेपणाने त्यांना मदत केली. फूड ब्लॉगर गौरव वासनने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर हे सर्व घडले. मात्र, थोड्याच वेळात ढाब्याचा मालक कांता प्रसाद यांनी ब्लॉगरविरुध्द मिळालेल्या देणगीचा गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला. ब्लॉगरने हे आरोप फेटाळून लावत आपली बँक स्टेटमेन्ट दाखवली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Dua (@dilsefoodie)

आता आणखी एका फुड ब्लॉगरने शनिवारी कांता प्रसाद यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी गौरव वासनवर केलेल्या आरोपावरून माफी मागीतली आहे. ते म्हणाले, “गौरव वासन, तो मुलगा चोर नव्हता आम्ही कधीच त्याला चोर म्हटले नाही. फक्त आमच्याडून एक चूक झाली. जनतेला एवढेच म्हणेण की माझ्याकडून चूक झाली असेल तर माफ करा, यापुढे मी काहीही करु शकत नाही” ब्लॉगर करण दुआ ने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

काळ बदलला… बाबा का ढाबाचे कांता प्रसाद पुन्हा ग्राहकांच्या प्रतिक्षेत

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बाबा कांता प्रसादने ढाब्यापासून काही दुर एक रेस्टॉरंट सुरु केले होते. परंतु दोन महिन्यांनंतर ते रेस्टॉरंट बंद पडले. त्यानंतर बाबा कांता प्रसाद परत आपल्या जून्या ढाब्यावर आले. ज्या ढाब्यावर ते प्रसिद्ध झाले होते.