Baba Siddique Murder Case Mumbai Crime Branch Arrested Shiv Kumar Gautam : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. ही या प्रकरणातील १७ वी अटक आहे. या प्रकरणी आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने गौरव विलास आपुणे (वय २३) याला गेल्या आठवड्यात अटक केली होती. तो कर्वे नगर, पुणे येथील रहिवासी आहे. हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झालं आहे. फरार आरोपींनी त्याला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले होते. पाठोपाठ आता आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून पळून गेलेला आरोपी शिवकुमार गौतम उर्फ शिवा याला रविवारी (१० नोव्हेंबर) अटक करण्यात आली आहे.

गोळीबारानंतर शिवा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. मात्र त्यांना मुंबईत परतण्याऐवजी शिवकुमारला घेऊनच या असं सांगण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्नील काळे, हवालदार विकास चव्हाण व हवालदार मंगेश सावंत यांनी बाहराइचमधून शिवकुमारला अटक केली व मुंबईला घेऊन आले. गेल्या कित्येक दिवसांपासून बाहराइचमध्ये जातीय हिंसाचार चालू आहे. या गंभीर परिस्थितीतही मुंबई पोलिसांमधील हे चार जवान तब्बल २५ दिवस बाहराइचमध्ये राहीले. अनेक दिवस त्याचा माग काढून त्याला पकडून मुंबईला घेऊन आले आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हे ही वाचा >> लाहोरमधील चौकाला भगत सिंहांचं नाव देण्याची मागणी फेटाळली; दहशतवादी म्हणत केली अवहेलना!

शिवाला पकडण्यासाठी मुंबईतून २१ पोलिसांचं पथक पाठवण्यात आलं

बाहराइचमध्ये थांबलेल्या या चार पोलिसांना गुरुवारी (७ नोव्हेंबर) शिवाबाबतची पुरेशी व ठोस माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी २१ अधिकाऱ्यांचं पथक पाठवण्यात आलं. या २५ जणांनी बाहराइचमध्ये सापळा रचून शिवकुमार गौतम उर्फ शिवाला बेड्या ठोकल्या.

हे ही वाचा >> Jharkhand Election 2024 : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाच्या विरोधात गुन्हा दाखल, काँग्रेसने केला ‘हा’ आरोप; नेमकं काय घडलं?

बिकट परिस्थितीवर मात करत कामगिरी फत्ते

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितलं की “आरोपी कोणताही मोबाइल वापरत नव्हता. त्यामुळे त्याचा माग काढणं अवघड झालं होतं. चार पोलीस कर्मचारी उत्तर प्रदेशमधील बाहराइचमधील त्याच्या गावी गेले. तिथे त्यांनी त्याचा शोध घेतला, त्याच्या नातेवाईकांची माहिती काढली. त्याच्या नातेवाईकांवर पाळत ठेवली. बाहराइचमध्ये जातीय हिंसाचार चालू असल्यामुळे पोलिसांना त्यांचं काम करणं खूपच अवघड झालं होतं. तरीदेखील बिकट परिस्थितीवर मात करत या चार पोलिसांनी आरोपीच्या तिथल्या ४५ नातेवाईकांची यादी तयार केली. त्यापैकी चार जण आरोपीच्या संपर्कात होते. आमच्या पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या”.

हे ही वाचा >> Supreme Court on firecracker ban: फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं विधान; धर्माचा उल्लेख करत सरकारला सुनावलं…

सहा़आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम म्हणाले, “ऐन दिवाळीत आमचे पोलीस कर्मचारी तब्बल २५ दिवस आपल्या कुटुंबापासून दूर उत्तर प्रदेशातील एका गावात, तिथल्या जंगलात तळ ठोकून बसले होते. त्यांच्या कामाचं कौतुक करायला हवं”. हा आरोपी नेपाळला पळून जाणार होता. त्याआधीच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Story img Loader