Bihar election result 2025 बिहार हे भारताच्या राजकीय पटलावरील एक महत्त्वाचे राज्य आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे, कारण नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीतून ठरणार होते.बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार? हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आतापर्यंत समोर आलेल्या कौलमध्ये एनडीएने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान, बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मथुरेतील एका कार्यक्रमात निवडणुकीच्या या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?

ते म्हणाले की, बिहारमध्ये तोच पक्ष जिंकेल ज्याला जनतेने मनापासून मतदान केले आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वातावरणात एका नवीन चर्चेची भर घातली आहे. आता सगळ्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे की, जनता खरोखरच आपले नेतृत्व कोणाच्या हाती सोपवते. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, बिहारमध्ये ज्याला जनतेने मत दिले असेल, तोच जिंकेल. जनतेचा आशीर्वाद सर्वात मोठा असतो. आम्ही फक्त एवढीच इच्छा व्यक्त करतो की, राष्ट्रवादी विचारधारेला आणि सनातन संस्कृतीला पुढे नेणारी शक्ती सत्तेत यावी.

शास्त्री म्हणाले की, निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाहीमध्ये जनता नेहमीच सर्वोपरी असते. त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता, केवळ एवढेच सांगितले की, देश आणि समाजाच्या हितासाठी काम करणारे सरकार स्थापन व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी पुढे म्हटले की, “आम्ही लोकांना फक्त इतकेच सांगतो की, तुम्ही ज्याला आपला नेता मानाल, तो राष्ट्र, धर्म आणि समाजासाठी समर्पित असावा. जनतेचा आशीर्वाद हाच खरा विजय आहे.”

बिहार निकालात एनडीए आघाडीवर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले असून नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेडने पक्षाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. जेडीयूने तब्बल ७५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर ८५ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल पक्षाला केवळ ३६ जागांवर आघाडी मिळाली आहे; तर काँग्रेसचे सहा उमेदवार आघाडीवर आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा असून त्यापैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तब्बल १८० हून अधिक जागांची आघाडी घेतली आहे.