पीटीआय, ढाका : बांगलादेशाच्या उत्तर भागात दोन दिवसांपूर्वी नौका बुडाल्याने मृत्यू झालेल्या हिंदू भाविकांची संख्या ६४ वर गेली आहे. रविवारी दुर्गा पूजा उत्सव सुरू होण्यापूर्वी पुरातन बोडेश्वरी मंदिराकडे हे भाविक एका नौकेतून निघाले होते. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने ती उलटली. आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६४ वर पोहोचली. मात्र, अद्यापही २० प्रवासी बेपत्ता आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही नौका उत्तर-पश्चिम पंचगढ जिल्ह्यातील कोरोटो नदीत उलटून बुडाली. ‘ढाका ट्रिब्यून’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात नमूद केले, की मंगळवारी सकाळी देबीगंज आणि बोडा उपजिल्ह्यांतील नदीपात्रात आणखी १४ मृतदेह सापडले. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू केले. गेल्या दोन दिवसांत ५० मृतदेह बाहेर काढल्यानंतर, बचाव पथकाने मंगळवारी पुन्हा शोधमोहीम सुरू केली, ‘बिडीन्यूज२४.कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार पंचगढचे अतिरिक्त उपायुक्त दीपंकर रॉय यांनी सांगितले, की या दुर्घटनेतून वाचलेल्यांचा असा दावा आहे, की या नावेत दीडशेहून अधिक प्रवासी होते. नाव बुडाल्यानंतर काही जण पोहत किनाऱ्यावर परतले. प्रारंभिक तपासात या नावेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि, या दुर्घटनेमागे इतरही कारणे असू शकतात. पूर्ण तपासांती वास्तव समोर येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh boat disaster death 20 devotees still missing ysh
First published on: 28-09-2022 at 00:02 IST