बांगलादेशातील दुर्गा पूजा मंडपावरील हल्ल्यात किमान तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. आता बांगलादेशच्या कोमिला पोलिसांनी उघड केले आहे की हिंसा भडकवण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांनी सांगितले की, एका व्यक्तीने कुराण दुर्गा पूजा मंडपामध्ये नेले आणि ठेवले होते जे हिंसाचाराचे कारण बनले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी ३५ वर्षीय इक्बाल हुसेनची चौकशी केली जात आहे, ज्याने ही कृत्य केले आहे. आरोपी इक्बाल मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याचे सांगितले जात आहे

पोलिसांनी सांगितले की, कुमिला जिल्ह्यातील सुजानगर येथील रहिवासी हुसेन यांने १३ ऑक्टोबर रोजी नानूआ दिघीच्या पूजा मंडपात कुराणची प्रत ठेवली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी तपासादरम्यान इक्बालचा या घटनेतील सहभाग उघडकीस आला. बांगलादेशातील पोलिसांनी मंडपामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केल्यानंतर हिंसाचारात इक्बाल हुसेनचा सहभाग उघड केला.

पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की इक्बाल कुराणची एक प्रत मशिदीतून दुर्गा पूजेच्या ठिकाणी नेतो. नंतर तो भगवान हनुमानाच्या मूर्तीजवळ जाताना दिसला.

कोमिलाचे पोलीस अधीक्षक फारूक अहमद यांनी असेही सांगितले की, आरोपी इक्बाल हुसेन हा भटक्या असून त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.  शहरातील दुर्गापूजा पंडल येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी कोमिला पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत आणि ४१ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी चार जण इक्बाल हुसेनचे सहकारी आहेत.

इक्बालची आई अमिना बेगमने ढाका ट्रिब्यूनला सांगितले की, तो ड्रग अॅडिक्ट आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी काही शेजाऱ्यांनी त्याच्या पोटात भोसकल्यानंतर तो मानसिकरित्या अस्थिर आहे. गेल्या आठवड्यात कुमिल्यातील ननुआ दिघीर येथील दुर्गा पूजा मंडपामध्ये कुराणची प्रत सापडल्यानंतर जातीय तणावामुळे किमान तीन लोकांचा मृत्यू झाला होता.

बांगलादेश हिंदू एकता परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, कुराणचा अपमान केल्याच्या अफवा स्थानिकांमध्ये पसरल्यानंतर कोमिलाच्या ननुआ दिघी येथील पूजा मंडपावर हल्ला करण्यात आला होता. पेकुआच्या मंदिरांमधून देखील अहवाल देण्यात आला.