Crime News : ३५ हजारांचं कर्ज असल्याने हिंदू महिलेला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना बांगलादेशात घडली आहे. या महिलेने आणि तिच्या भावाने घटनेबाबत पोलिसात तक्रार दिल्याने ही धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी ११ वाजण्याच्या सुमारास हिंदू महिला तिच्या वडिलांच्या घरी दोन मुलींसह होती. त्यावेळी तिने दरवाजावर टकटक आवाज ऐकला. आरोपी फझर अली आला आहे. तो कुख्यात असल्याने हिंदू महिलेने दरवाजा उघडला नाही. तिने मी दरवाजा उघडणार नाही असं फझर अलीला सांगितलं. त्यानंतर अली फजर दरवाजा तोडून आतमध्ये आला. त्याने या महिलेचे कपडे काढून तिला नग्न केलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. तसंच तिच्यावर त्याने बलात्कारही केला. ३५ हजारांचं कर्ज तुझ्या कुटुंबाने घेतलं पण फेडलं नाही असं सांगत त्याने या महिलेला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेला बेदम मारहाण करण्यात आल्याचं दिसत होतं. तसंच तिच्या अंगावर गंभीर स्वरुपाच्या जखमा होत्या अशी माहिती बांगलदेशातील एका वरिष्ठ पोलस अधिकाऱ्याने दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
फझर अली जेव्हा महिलेच्या घरात शिरला तेव्हा तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. पण कुणीही तिच्या मदतीला धावलं नाही. फझर जेव्हा या महिलेवर अत्याचार करत होता तेव्हा काही लोकांनी त्यांचं शूटिंग त्यांच्या मोबाइलमध्ये केलं. गर्दीचा रेटा वाढल्यानंतर फझरने तिथून पळ काढला. मात्र महिलेने तिच्यावर बलात्कार करुन फझर पळाल्याचं लोकांना सांगितलं तेव्हा त्याच्या दिशेने लोकांनी आपला मोर्चा वळवला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ढाका या ठिकाणी फझरला अटक करण्यात आली.