Interim Government in Bangladesh: बांगलादेशमध्ये राजकीय भूकंप झाला असून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. इतकंच नव्हे, तर त्यांना देश सोडून जावं लागल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या घडामोडींची चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच, बांगलादेशसाठी भारत हाच सीमा लागून असणारा एकमेव शेजारी देश आहे. त्यामुळे बांगलादेशमधील या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होणार? याचेही अंदाज बांधले जात आहेत. त्यातच आता बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांचं नाव चर्चेत आलं आहे.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांचा युनूस यांना पाठिंबा असून त्यांनीच देशाचं पंतप्रधानपद स्वीकारावं, अशी इच्छा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. एकीकडे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान यांनी देशात अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली असताना दुसरीकडे थेट मोहम्मद युनूस यांना आंदोलकांचाच पाठिंबा असल्यामुळे बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात येत्या काही दिवसांत प्रचंड घडामोडी होण्याची शक्यता आहे.

emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
Prime Minister Narendra Modi said efforts to strengthen relations between India and Brunei
ब्रुनेईबरोबर संबंध दृढ करण्याचे प्रयत्न; पंतप्रधान मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Amantullah Khan Arrested BY ED
Amantullah Khan : आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना ईडीने केली अटक, वक्फ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई
Power contract workers union hunger strike postponed
ऊर्जामंत्र्यांशी चर्चेनंतर कंत्राटी कामगार संघटनेचे उपोषण स्थगित
bangladesh student protest news
बांगलादेशमधील हिंसाचारावर नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांचं परखड भाष्य! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आंदोलकांची सरकार स्थापनेची योजना तयार!

अँटि-डिस्क्रिमिनेशन स्टुडेंट मूव्हमेंट या आंदोलकांच्या मुख्य समन्वय समितीनं नव्या सरकार स्थापनेची योजना तयार केली असून त्यात नोबेल पुरस्कार विजेते बांगलादेशी अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांना पंतप्रधानपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकिंग क्षेत्रात केलेल्या कामगिरीची जगभरात चर्चा झाली होती. मात्र, शेख हसीना यांच्या कारकि‍र्दीत मोहम्मद युनूस यांच्यावर काही खटलेही दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी मोहम्मद युनूस यांचं नाव प्रस्तावात घेतल्यामुळे त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

मोहम्मद युनूस यांची शेख हसीनांवर आगपाखड

दरम्यान, शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याच्या घटनेवर आता देश-विदेशातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खुद्द मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्या कारकि‍र्दीवर टीका करताना “हा देश आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला”, असं विधान केलं आहे. युनूस यांनी दोन दिवसांपूर्वीच इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये हसीना यांच्यावर हल्लाबोल केला होता. तसेच, बांगलादेशमध्ये पारदर्शी निवडणुका आणि लोकशाहीसाठी प्रयत्न न केल्याबद्दल आपण भारताला माफ करू शकत नाही, असंही विधान त्यांनी केलं होतं. आता हसीना यांच्या राजीनाम्यावर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Sheikh Hasina : “शेख हसीना बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत”, पुत्र साजिब वाजेद यांचं मोठं वक्तव्य; पुढील योजना सांगत म्हणाले…

“आम्ही शेख हसीना यांच्या कारकि‍र्दीत त्यांच्या अंमलाखालचा देश होतो. त्या एखाद्या अंमलदाराप्रमाणे वागत होत्या. एखाद्या हुकुमशाहप्रमाणे सगळंकाही नियंत्रित करत होत्या. आज बांगलादेशचे सर्व नागरिक स्वतंत्र झाले आहेत”, असं युनूस म्हणाले आहेत. तसेच, हसीना यांनी त्यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांचा थोर वारसा उद्ध्वस्त केला, असंही ते म्हणाले.

आंदोलकांच्या कृत्यांचं समर्थन

दरम्यान, सोमवारी काही आंदोलक शेख हसीना यांच्या शासकीय निवासस्थानी घुसून तिथे तोडफोड करताना दिसले. काहींनी वस्तू उचलून नेल्या, तर काहींनी तिथल्या वस्तूंची नासधूस केली. अनेकजण तिथल्या तलावात डुंबत असल्याचंही दिसलं. यासंदर्भात विचारणा केली असता मोहम्मद युनूस यांनी आंदोलकांच्या कृत्यांचं समर्थन केलं.

Bangladesh Army Chief Zaman: शेख हसीना यांनाही जमलं नाही, ते करू धजावणारे बांगलादेशचे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान कोण आहेत?

“आंदोलकांचा संताप आणि त्यांनी केलेली नासधूस ही त्यांची शेख हसीना यांनी केलेल्या नुकसानीवरची प्रतिक्रिया होती. मला आशा आहे की आता हे तरुण आणि विद्यार्थी बांगलादेशाला उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं घेऊन जातील”, असं मोहम्मद युनूस यांनी नमूद केलं.

युनूस सल्लागाराच्या भूमिकेत राहणार?

दरम्यान, मोहम्मद युनूस हे प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी न होता सरकारचे सल्लागार म्हणून कार्यरत राहणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरच बांगलादेशमधील पुढील घडामोडींचा अंदाज बांधता येणं शक्य असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे.