Bangladesh Protest News Updates : बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन प्रचंड चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशाबाहेर पलायन केले. यामुळे बांगलादेशातील त्यांची १५ वर्षांची राजवट अचानक संपुष्टात आली असून लष्करप्रमुखांनी लवकरच हंगामी सरकारची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हुल्लडबाजांनी ढाकाच्या दिशेने कुच केली आणि पंतप्रधान निवासस्थावर हल्ला चढवला. दरम्यान, शेख हसीना यांच्या राजीनाम्यामुळे बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून सध्या त्या भारताच्या आश्रयास आल्या आहेत. त्यांच्याप्रकरणी भारत लवकरच निर्णय घेणार आहे. त्याकरता आज परराष्ट्र मंत्री एस. शंकर यांनी सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे. त्यामुळे बांगलादेशातील अराजकतेवर भारतात काय ठराव होतोय, हे पाहणं महत्त्वाचं आहे.