Bangladesh Protest News Updates : बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन प्रचंड चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशाबाहेर पलायन केले. यामुळे बांगलादेशातील त्यांची १५ वर्षांची राजवट अचानक संपुष्टात आली असून लष्करप्रमुखांनी लवकरच हंगामी सरकारची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हुल्लडबाजांनी ढाकाच्या दिशेने कुच केली आणि पंतप्रधान निवासस्थावर हल्ला चढवला. दरम्यान, शेख हसीना यांच्या राजीनाम्यामुळे बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून सध्या त्या भारताच्या आश्रयास आल्या आहेत. त्यांच्याप्रकरणी भारत लवकरच निर्णय घेणार आहे. त्याकरता आज परराष्ट्र मंत्री एस. शंकर यांनी सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे. त्यामुळे बांगलादेशातील अराजकतेवर भारतात काय ठराव होतोय, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Bangladesh News Live Updates : बांगलादेशमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा
बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची विनंती केली होती, अशी माहिती आज भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी संसदेत दिली. “शेख हसीना यांनी भारतात येण्यासाठी अचानक विनंती केली”, असं एस.जयशंकर यांनी सांगितलं. दरम्यान, शेख हसीना या भारतात येण्याचं कारणं म्हणजे बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशाचे संबंध चांगले आहेत. तसेच शेख हसीना यांचे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चांगले संबंध होते. तसेच शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मित्र होते. शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर शेख हसीना यांनी अनेक वर्षे दिल्लीतच आश्रय घेतला होता. दरम्यान, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील विरोधी पक्ष काँग्रेस अशा दोघांशीही शेख हसीना यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडल्यानंतर भारतात येण्याचा निर्णय घेतला असवा, असं बोललं जात आहे.
कोलकाता-ढाका-कोलकाता दरम्यान भारतातून बांगलादेशमध्ये धावणारी मैत्री एक्स्प्रेस बुधवारीही बंद राहणार आहे, असे इस्टर्न रेल्वेने सांगितले.
बांगलादेश रेल्वेच्या संदेशाचा हवाला देऊन, ईआरने मंगळवारी सांगितले की मैत्री एक्स्प्रेसची सेवा १९ जुलैपासून कार्यरत नाही, बुधवारी सेवा पुन्हा सुरू होणार नाही. दोन आठवड्यातून एकदा धावणारी कोलकाता-खुलना-कोलकाता बंधन एक्स्प्रेसही २१ जुलैपासून बंद ठेवण्यात आली आहे.
बांगलादेशमध्ये १९ हजार भारतीय असून त्यापैकी ९ हजार विद्यार्थी आहेत – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
भारतीय सीमा रक्षकांना बांगलादेशच्या परिस्थितीबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे – परराष्ट्रमंत्री
५ ऑगस्ट रोजी संचारबंदी असूनही ढाका येथे निदर्शक एकत्र आले. सुरक्षा आस्थापनांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भारतात येण्याची विनंती केली. तसंच, बांगलादेश अधिकाऱ्यांकडून फ्लाईट क्लिअरनन्ससाठीही विनंती मिळाली. त्यानुसार त्या काल (५ ऑगस्ट) सायंकाळी दिल्लीत दाखल झाल्या – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
#WATCH | Speaking in Rajya Sabha on the situation in Bangladesh, External Affairs Minister Dr S Jaishankar says, "…On 5th August, demonstrators converged in Dhaka despite the curfew. Our understanding is that after a meeting with leaders of the security establishment, Prime… https://t.co/Z9AfVaoYsJ
— ANI (@ANI) August 6, 2024
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेश संसद मंगळवारी विसर्जित करण्यात आली.रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी त्यांच्या सकाळच्या फेसबुक व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या नेत्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने लवकरच स्थापन होणाऱ्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार होण्याचे मान्य केले होते. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान यांनी काल पदभार स्वीकारला होता. ते आज आंदोलनकर्त्यांना भेटणार आहेत, असे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.
बांगलादेशात आरक्षणावरून सुरू असलेला हिंसाचार उफाळल्याने शेख हसीना यांनी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला. देशातून पलायन करण्याआधी त्यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. १९७५ सालापासून शेख हसीना यांनी भारतात दीर्घकाळ वास्तव्य केलं होतं. त्यामुळे बांगलादेशातून इतर देशात जाण्याआधी त्यांनी यावेळी पुन्हा भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशातून भारतात त्यांना सुरक्षित आणण्याकरता भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोलाची कामगिरी पार पाडली आहे.
बांगलादेशच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या भविष्याबद्दल, विशेषतः बांगलादेशातील अलीकडील घटनांबाबत चिंता व्यक्त केली. सरकारकडून माहिती दिल्यानंतर गांधी यांनी राष्ट्रीय हितासाठी केलेल्या उपाययोजनांना पाठिंबा दर्शविला. त्यांनी या घटनेत परदेशी शक्तींचा सहभाग आहे का असा सवालही केला आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या मालमत्तेवर झालेल्या हल्ल्यांच्या अहवालाचा हवाला देऊन त्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. हिंदूस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारतीय लष्कराला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वेट अँन्ड वॉचची भूमिका भारत सरकारने स्वीकारली आहे.
जयशंकर यांनी बांगलादेशातील घडामोडींचा भारतावर होणाऱ्या सर्व संभाव्य परिणामांवर भाष्य केले. बाहेरून हस्तक्षेप झाल्यास भारताची रणनीती काय असेल याबद्दलही त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केल्याचे वृत्त आहे.
भारत सरकार बांगलादेश लष्कराच्या संपर्कात असून भारतीय लष्कराला सतर्क केले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी आज सकाळी संसद भवनात बैठक घेतलेल्या नेत्यांना दिली. “आपल्या देशाची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम सुरू आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच, एक्सवर पोस्ट करताना एस. जयशंकर म्हणाले, “एकमताने समर्थन आणि पाठिंब्याबद्दल परराष्ट्रमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक आहे.”
Briefed an All-Party meeting in Parliament today about the ongoing developments in Bangladesh.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 6, 2024
Appreciate the unanimous support and understanding that was extended. pic.twitter.com/tiitk5M5zn
Sanjay Raut On Bangladesh Political Crisis : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यानंतर आता भारतातही यासंदर्भात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही बांगलादेशमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
USA On Bangladesh Political Crisis : बांगलादेशमध्ये राजकीय भूकंप झाला असून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. इतकंच नव्हे, तर त्यांना देश सोडून जावं लागल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या घडामोडींची चर्चा पाहायला मिळत आहे. येथील अराजक परिस्थितीवर आता जगभरातील देशांकडून चिंताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बांगलादेशमधील परिस्थितीबाबत आता अमेरिकेनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून त्यांची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. दरम्यान, त्यांनी बांगलादेशातून पलायन केल्यानंतर त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या खालिदा झिया यांना ताबडतोब तुरुंगात मुक्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचं लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान यांनी सांगतिलं.
#WATCH | Delhi: All-party meeting underway in the Parliament on the issue of Bangladesh. EAM Dr S Jaishankar briefs the members of different political parties. pic.twitter.com/4Cl1rFRkyG
— ANI (@ANI) August 6, 2024
बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तेथील पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्या भारतात आश्रयासाठी आल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशीमधील परिस्थिती बिघडल्यानंतर या घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बांगलादेशात वास्तव्यात असलेले जवळपास १ कोटी हिंदू निर्वासित भारतात येतील, अशी भीती भाजपा नेते आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
बांगलादेशात गेल्या महिन्यापासून सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थी आंदोलन सुरू होते. शनिवारी आंदोलन अधिक तीव्र होऊन त्याला हिंसक वळण लागले. रविवारी झालेल्या सत्ताधारी आवामी लिगचे कार्यकर्ते आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ पोलिसांसह १००पेक्षा जास्त लोक मारले गेले. काही माध्यमांनी मृतांचा आकडा ३००हून अधिक असल्याचा दावा केला आहे. या दंगलींनंतर सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लावली होती. सोमवारी हसीना यांच्या विरोधकांनी आंदोलकांच्या साथीने ढाक्यामध्ये मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि हसीना यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या लष्कराच्या विमानाने देशाबाहेर पळाल्या.
Bangladesh News Live Updates : बांगलादेशमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा