बांगलादेश हिंसाचार : दुसरा मुख्य संशयित अटकेत

कुमिला येथे दुर्गापूजा मंडपात कुराणाची प्रत ठेवणारा प्रमुख संशयित इक्बाल हुसेन याला पोलिसांनी शुक्रवारी कॉक्स बाझार येथून अटक केली होती.

ढाका : बांगलादेशात अलीकडेच दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदूंविरुद्ध उफाळलेला हिंसाचार आणि मंदिरांवरील सामूहिक हल्ले यातील दुसरा प्रमुख संशयित असलेल्या तिशीतील एका तरुणाला बांगलादेशातील सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी अटक केली.

वायव्येकडील रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ह्यात १७ ऑक्टोबरला झालेल्या गोंधळाचा सूत्रधार असलेला शैकत मंडल आणि त्याचा साथीदार या दोघांना ढाक्याच्या सीमेवरील गाझीपूर येथून शनिवारी अटक करण्यात आली, असे रॅपिड अ‍ॅक्शन बटालियनच्या (आरएबी) अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंडलने केलेल्या फेसबुक लाइव्हमुळे लोक भडकले आणि त्यातून हिंसाचाराची लाट उसळली, असे आरएबीचा एक अधिकारी म्हणाला. १७ ऑक्टोबरच्या मंडलच्या फेसबुक पोस्टमुळे पीरगंज येथे करण्यात आलेल्या हल्ल्यांत हिंदूंची किमाने ७० घरे व दुकाने पेटवून देण्यात आली होती.

कुमिला येथे दुर्गापूजा मंडपात कुराणाची प्रत ठेवणारा प्रमुख संशयित इक्बाल हुसेन याला पोलिसांनी शुक्रवारी कॉक्स बाझार येथून अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंडल याला अटक झाली आहे. हुसेन याला सध्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदूंविरुद्ध हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आतापर्यंत देशाच्या निरनिराळ्या भागांतून सुमारे ६०० लोकांना अटक केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bangladesh violence second main suspect arrested akp

ताज्या बातम्या