Rahul Anand : पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बांगलादेशमध्ये अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलकांकडून आता बांगलादेशमधील हिंदूंनादेखील लक्ष्य करण्यात येत आहे. आंदोलकांनी बांगलादेशमधील प्रसिद्ध हिंदू गायक राहुल आनंद यांच्या १४० वर्ष जून्याघराचंदेखील नुकसान केलं आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आक्रमक आंदोलकांनी मंगळवारी गायक राहुल आनंद यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या घरातील वस्तूंची तोडफोड केली. तसेच त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे आंदोलकांनी हल्ला केला त्यावेळी राहुल आनंद हे त्यांच्या परिवारासह घरात होते. मात्र सुदैवाने त्यांना आंदोलकांच्या तावडीतून निसटण्यात यश आलं. त्यांनी आता बांगलादेशमधील एका अज्ञातस्थळी आश्रय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे.
हेही वाचा – Bangladesh Protest: बांगलादेशमधील आंदोलनात हिंदू मंदिरे लक्ष्य; इस्कॉन मंदिराला आग लावली
१४० वर्ष जुनं होतं राहुल आनंद यांचं घर
मीडिया रिपोर्टनुसार, आंदोलकांनी राहुल आनंद यांचे जे घर जाळलं आहे, ते जवळपास १४० वर्ष जूने असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल आनंद यांनी या घरात जवळपास ३००० पेक्षा जास्त संगीत वाद्य जनत करून ठेवली होती. मात्र, आंदोलकांनी आता या संगीत वाद्यांचं नुकसान केलं आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रपतींनीही दिली होती भेट
दरम्यान, गेल्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रॉन हे बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राहुल आनंद यांच्या ढाकातील १४० वर्ष जुन्या घरी भेट दिली होती.
हेही वाचा – बांगलादेशमधील अस्थिरता, शेख हसीना यांनी देश सोडणं यामुळे भारताच्या चिंतेत वाढ; काय आहेत कारणं?
बांगलादेशमध्ये हिंदूंना केलं जातं आहे लक्ष्य
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मागच्या काही तासांत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेनंतर अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली आहेत. येथील हिंदू नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. या हल्ल्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय बांगालादेशमधील मंदिरांनासुद्धा लक्ष्य करण्यात येत आहे. मंगळवारी मेहेरपूरमधील इस्कॉन मंदिरात जाळपोळ करण्यात आली. या मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी अशा तीन मूर्त्या जाळण्यात आल्या आहेत. याबरोबरच इतर मंदिरांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.
बांगलादेशमधील मंदिरे धोक्यात?
बांगलादेशमधील हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी कॉन्सिलचे नेते काजोल देबनाथ पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, सोमवारी आंदोलन भडकल्यानंतर बांगलादेशमधील हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले, पण त्यात फार नुकसान झाले नाही.
© IE Online Media Services (P) Ltd