scorecardresearch

उदयपूर, अमरावतीतील घटनांनंतर विश्व हिंदू परिषदेचा मोठा निर्णय; आता गुजरातमध्ये…

गुजरात विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक रावल यांनी ही माहिती दिली आहे.

Banjarang Dal and Vishwa Hindu Parishad Start Helpline For Hindus In Gujarat after Udaipur And Amravati Incident spb 94
संग्रहित

VHP Helpline For Hindu : उदयपूर आणि अमरावतीतील घटनेनंतर बंजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद तर्फे गुजरातमध्ये हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात येत आहे. तसेच हिंदूंना आर्थिक आणि कायदेशीर मदत देणार असल्याचेही बंजरंग दल तर्फे सांगण्यात आले आहे. गुजरात विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक रावल यांनी ही माहिती दिली आहे.

”काही समाजकंटक आजकाल हिंदूंना धमकावत आहेत. हिंदूंना कसे टार्गेट केले जाते हे आपण अलीकडील काही घटनांमध्ये पाहिले आहे. हिंदूंना शिरच्छेद करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हिंदू घाबरले आहेत.”, अशी प्रतिक्रिया गुजरात विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक रावल यांनी दिली आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले, ”आम्ही हिंदूंसाठी एक हेल्पलाईन सुरू करत आहे. ही हेल्पलाईन २४ तास सुरू असेल. कोणालाही काही समस्या असल्यास पहिले स्थानिक पोलिसांना संपर्क करावा. अधिक मदत लागण्यास आम्हाला संपर्क करावा. आम्ही त्यांना आर्थिक व कायदेशीर मदत देऊ.”

हेही वाचा – अभिमानास्पद! गीता गोपीनाथ यांचा IMF कडून मोठा सन्मान, ठरल्या ‘अशी’ कामगिरी करणाऱ्या पहिल्या महिला!

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Banjarang dal and vishwa hindu parishad start helpline for hindus in gujarat after udaipur and amravati incident spb