बँक कर्मचारी संपावर जाणार; चार दिवस कामकाज राहणार ठप्प

नोव्हेंबर महिन्यातही कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र

सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस बँका चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपाचा इशारा दिला आहे. चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्यानं बँकेचे कामकाज चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 10 सरकारी बँकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारने 10 बँकांचे विलिनिकरण करून 4 मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही बँक कर्मचारी अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाऊ शकतात, असं बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून सांगण्यात आलं आहे. कामाचा आठवडा सहा ऐवजी पाच दिवसांचा करण्याची मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक आफिसर्स असोसिएशन (AIBOA), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (INBOC) आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (NOBO) या संघटनांनी संपाची घोषणा केली आहे.

26 सप्टेंबर रोजी गुरूवार आणि 27 सप्टेंबर रोजी शुक्रवार आहे. या दिवशी संप पुकारल्यामुळे बँकांचं कामकाज ठप्प राहणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि 29 सप्टेंबर रोजी रविवार असल्यामुळे बँकांचं कामकाज बंद असेल. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. देशभरातील सरकारी बँकांचे कर्मचारी 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 27 सप्टेंबर मध्यरात्री पर्यंत संपावर जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात आणि आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ‘एसआयबीओसी’चे (चंदीगड) महासचिव दीपक कुमार शर्मा यांनी दिली.

सरकारी बँका संपावर जाणार असल्या तरी खासगी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. सरकारने 10 बँकांचे विलिनिकरण करून चार बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँकेचे पीएनबी बँकेत विलिनिकरण होणारआहे. तर सिडिकेट बँकचे कॅनरा बँकेत, अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकचे युनियन बँकेत विलिनिकरण करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bank employee union will go on strike 26 and 27 september bank close for four days jud

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या