Bashar Al Assad Sentenced To Death: सीरियातील न्यायालयाने मंगळवारी पदच्युत अध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे वृत्त वृत्तसंस्था एएफपीने दिले आहे. सीरियन गृहयुद्धादरम्यान युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धचे गुन्हे या आरोपांखाली असद यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये असद पदच्युत झाले होते. सैन्याने दमास्कसला वेढा घातल्यावर असद आपल्या कुटुंबासह मॉस्कोला पळून गेले.

अतेफ नजीब याला देखील मृत्यूदंडाची शिक्षा

सीरियातील न्यायालयाने याबाबतचा निर्णय आज दिला आहे. न्यायालयाने अतेफ नजीब याला देखील मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. अतेफ नजीब दक्षिण सीरियातील राजकीय सुरक्षा विभागाचा माजी प्रमुख होता शिवाय तो असद यांचा चुलत बंधूही होता. अतेफ नजीबवर बंधीवासात असलेल्या लोकांवर अत्याचार करणे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लेक्ष करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. यात अनेक लहान मुलांचा देखील समावेश होत तसेच, यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अतेफ याला जबाबदार धरले आहे.

महत्वाचा निर्णय

बशर अल-असद आणि अतेफ नजीब यांच्या शिक्षेचा निर्णय न्यायालयाचा महत्वाचा निर्णय मानला जात आहे. सुनावणीसाठी उपस्थित असणारे आणि अनुपस्थित असणाऱ्या दोघांसाठी न्यायालयाकडून निर्णय दिला जात आहे. न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी बशर अल-असद अनुपस्थित होते तर, अतेफ नजीब आरोपीच्या गणवेषात न्यायालयात हजर होता. नजीबला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध सुनावणी सुरु झाली होती. राजकीय कैद्यांमध्ये नजीब प्रमुख नाव होते.

बश अल -असद सत्तापर्व

वडील हाफीज अल – असद यांच्या निधनानंतर बश अल -असद यांनी देशाची सूत्रे हाती घेतली होती. हाफीज अल – असद यांनी जवळपास ३० वर्षे देशावर राज्य केले तर, डिसेंबर २०२४ मध्ये सरकार कोसळेपर्यंत बश अल -असद सत्तेवर होते. सीरियात २०११ पासून गृहयुद्धाला सुरुवात झाली. सुरक्षा यंत्रणांनी सरकारविरोधातील आंदोलन मोडीत काढण्यासाठी बळाचा वापर केला. देशात निर्माण झालेली अस्थिरता हळुहळू देशात सर्वदूर पसरली. यात कालांतराने मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप, बंडखोरांचा समावेश आणि विदेशी शक्तींचा सहभाग दिसून आला.