Be more careful traveling in India America warning crime terrorism ysh 95 | Loksatta

भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा

वाढते गुन्हे आणि दहशतवादामुळे भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास करू नका, असे आवाहन  अमेरिकेने आपल्या नागरिकांना शुक्रवारी केले.

भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा
प्रतिनिधिक छायाचित्र

वॉशिंग्टन : वाढते गुन्हे आणि दहशतवादामुळे भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास करू नका, असे आवाहन  अमेरिकेने आपल्या नागरिकांना शुक्रवारी केले. भारतात प्रवास करण्याबाबतची नियमावली अमेरिकेने शुक्रवारी जारी केली. त्यानुसार प्रवास नियमावलीची पातळी दोन पर्यंत कमी केली. ती आधी चापर्यंत होती. गुन्हे आणि दहशतवादामुळे भारतात फिरताना अतिसावध राहा, असे अमेरिकेने जारी केलेल्या प्रवास नियमावलीत म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गुरुवारी पाकिस्तानबाबतची प्रवास नियमावली जाहीर करून त्याला तिसऱ्या पातळीवर ठेवले होते. दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसाचारग्रस्त पाकिस्तानात प्रवास करणार असाल तर त्याबाबत पुनर्विचार करा, असा इशारा आपल्या नागरिकांना दिला होता.

दहशतवाद आणि अशांततेमुळे जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात (पूर्व लडाख आणि त्याची राजधानी लेह वगळता) प्रवास करू नका. सशस्त्र संघर्षांच्या शक्यतेमुळे भारत-पाकिस्तान १० किमी परिसरात प्रवास करू नका, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. भारतातील गुन्हे अहवालानुसार तेथे वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी बलात्कार हा एक आहे, असे अमेरिकेने नमूद केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गौरी लंकेश यांची आई-बहीण ‘भारत जोडो’त सहभागी

संबंधित बातम्या

“…ही नवीन ‘नग्नता’ आहे का?”; पंतप्रधान मोदींचे २० फोटो शेअर करत प्रकाश राज यांची पोस्ट
शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “
धक्कादायक: प्रेषित म्हणवणाऱ्या या गृहस्थाला २० पत्नी; आपल्याच कोवळ्या मुलीशीही केला विवाह
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“भगवद्गीता धर्मग्रंथ ८० टक्के हिंदूंच्या…” शरद पोंक्षे यांनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
नवरदेवाची भन्नाट एन्ट्री! चक्क कुत्र्यासोबत आला बाईकवर बसून, Video व्हायरल
‘तुम्हाला, मी मरावे असे का वाटते?’ पाकिस्तानी पत्रकारावर भडकला नसीम शाह, पाहा व्हिडिओ
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही? काँग्रेसचा सवाल
Video : शिव ठाकरेला बिग बॉसच्या घरात अश्रू अनावर, रडत- रडत म्हणाला…