रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाली आहे. याबाबत पीडित विद्यार्थ्यांना आलेल्या ह्रदयद्रावक अनुभव माध्यमांना सांगितले आहेत. युक्रेन-पोलंड सीमेवर युक्रेनच्या सुरक्षा रक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना प्रवेश दिला आणि भारतीयांना बाजूला काढून मुलं आणि मुली न पाहता लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकारही समोर आलाय.

साक्षी इजनकर या विद्यार्थीनीने झी २४ तासला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं, “आम्ही जेव्हा युक्रेन-पोलंड सीमेवर आलो तेव्हा आम्हाला सुरक्षा रक्षकांनी घेरलं होतं. आम्हाला प्रवेशद्वारावर प्रवेश देण्यात आला नाही. तेथून केवळ युक्रेनच्या नागरिकांना पोलंडमध्ये प्रवेश दिला जात होता. खूप विनवण्या केल्यानंतर केवळ भारतीय मुलींना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी भारतीय मुलांना बेदम मारहाण केली.”

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

“अस्थमाचा त्रास असणाऱ्यांचाही छळ”

“पोलिसांनी मारहाणीसोबतच मुलांचा छळही केला. ज्यांना अस्थमाचा त्रास होता त्यांना मारहाण करून त्यांना कसा श्वास घेता येत नाही असं दाखवलं. यानंतर रात्री ११ ते १२ च्या दरम्यान मारहाण केल्यानंतर प्रवेश देण्यात आला. आम्ही खूपच घाबरलो होतो. पोलंडमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे ४ रांगा गेल्या. नंतर त्यांना ३ रांगा हव्या होत्या, तर त्यांनी पुन्हा बंदुका घेऊन मारहाण केली,” असं या विद्यार्थीनीने सांगितलं.

हेही वाचा : “युक्रेनमधील भारतीयांना काहीही होणार नाही”, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा मोदींना शब्द

“आतमध्ये गेल्यावर व्हिसाबाबत हंटर गेम खेळायचा होता. तो काय खेळ असतो ते मला माहिती नव्हतं. तिथं गेल्यावर ते रॉड आणि बंदुका घेऊन उभे होते. हा खेळ खेळल्यावर तुम्हाला व्हिसा मिळेल असं ते म्हणाले. यानंतर त्यांनी तिथं असलेल्या विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलगा आहे की मुलगी हेही पाहिलं नाही,” असंही साक्षी इजनकरने नमूद केलं.

एकूणच युद्धाच्या छायेतील युक्रेनमधून अनेक लोक शेजारी देशांचा आसरा घेत सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत आहेत. यात भारतीयांचाही समावेश आहे. मात्र, युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये जाताना भारतीयांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. आधी युक्रेनच्या नागरिकांना प्राधान्य दिलं जात आहे. भारतीयांना प्रवेश दिला जात नाही, अशी तक्रार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन सीमेवर नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.