राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या जवळ हाय सिक्युरिटी झोन असलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटानंतर जवळपासच्या गाड्यांनी देखील पेट घेतला या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची महिती मिळत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतदेह छिन्नविच्छिन झाल्याची माहितीही समोर आली आहे. दिल्लीसह मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान दिल्ली स्फोटाच्या आधी घडलेल्या चार घटना काय जाणून घेऊ.

काय काय घटना घडल्या?

१) मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आलली. हरियाणातल्या फरिदाबाद या ठिकाणी पोलिसांनी ३६० किलो अमोनियम नायट्रेट हे स्फोटक पकडलं. तसंच २५०० किलो स्फोटकांसाठी लागणारी रसायनंही पोलिसांनी जप्त केली आहे. तसंच एक रायफल, तीन मॅगझिन, ८३ जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली.

२) डॉक्टरसह संशयितांना अटक करण्यात आली. अल फतेह विद्यापीठातील डॉक्टर आणि काही संशयितांना पोलिसांनी अटक केली. मुझम्मील शकील असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव आहे. तर आदिल अहमद नावाच्या डॉक्टरलाही पोलिसांनी अटक केली. इश्तियाक नावाच्या एका इमामलाही पोलिसांनी अटक केली.

जैश ए मोहम्मद, अन्सार गझवा अल हिंद या संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनांचाच हात फरिदाबादच्या प्रकरणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिल्लीवर हल्ला करण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले अशी माहितीही समोर आली होती. तरीही दिल्लीत एक स्फोट झाला आहे.

४) पाकिस्तानशी संबंधित हँडलर्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच आणखी शस्त्रं, स्फोटकं आढळून येतात का? यासंदर्भातही पोलिसांचा तपास सुरु आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.