भारतीय लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी आज दुपारी होणा-या भारत-पाकिस्तान ब्रिगेडीअर स्तरावरील ध्वजबैठकीच्या पूर्वी म्हचले की भारतीय सैनिकांचे  शीर कापण्याच्या कृतीला खपवून घेतले जाणार नाही.
पाकिस्तानची ही कृती माफीसाठी पात्र नाही. तेव्हाच च्यांनी हेमराज यांचे शीर परत आणण्यावर म्हटले की, या संबंधी त्यांनी सरकारी पातळीवर चर्चा केली आहे. डीजीएमओ यांनाही याबाबत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नियंत्रण रेषेवरील तनाव कमी करण्य़ासाठी होणा-या ध्वजबैठकीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल (रविवार) पाकिस्तानी सेनेकडून शांततेचे उल्लंघन करत जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला..