माओवादाचे तत्त्वज्ञान आणि आपली राज्यघटना यांची वैचारिक बैठक विभिन्न आहे. मात्र, असे असले तरी माओवादी असणे गुन्हा नव्हे, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. माओवादी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या श्याम बालकृष्ण यांच्यावरील खटल्यासंदर्भात न्यायालयाने हा निकाल दिला .
बालकृष्ण याला पोलिसांनी अटक केली होती. तो माओवादी कारवायांमध्ये गुंतला असल्याचा संशय त्याच्यावर होता. मात्र, त्याच्यावरील हा आरोप पोलीस न्यायालयात सिद्ध करू शकले नाही. त्यावरील सुनावणीदरम्यान न्या. ए. मुहम्मद मुश्ताक यांनी वरील निकाल दिला.