चीनमधील स्वस्त उत्पादनांची आयात आणि बीजिंगवरील आर्थिक अवलंबित्व यांमुळे युरोपच्या उद्योगांना मोठा फटका बसला असल्याची स्पष्टोक्ती बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट दे वेवर यांनी गुरुवारी भारत दौऱ्यादरम्यान व्यक्त केली. भारताने या धोक्याबद्दल युरोपला इशारा दिला होता; मात्र त्याकडे युरोपने दुर्लक्ष केले, अशी कबुलीही त्यांनी आधी दिली होती. नवी दिल्लीतील सीआयआयच्या कार्यक्रमात बोलताना डी वेव्हर यांनी चीनचे नाव थेट घेतले नाही. मात्र, युरोपच्या उद्योगांना स्वस्त वस्तूंच्या माध्यमातून कमकुवत करणारा आणि आर्थिक अवलंबित्व निर्माण करणारा देश कोण आहे, हे स्पष्ट असल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितले.
युरोपीय उद्योगांना मोठा धक्का
डी वेव्हर यांच्या मते, गेल्या काही वर्षांत युरोपला आपल्या आर्थिक धोरणांचा पुन्हा विचार करण्यास भाग पाडणारा अनुभव आला आहे. परदेशातले मोठ्या प्रमाणातील उत्पादन युरोपियन बाजारपेठेत कमी किमतीत येत राहिले. त्यामुळे स्थानिक उद्योगांवर दबाव निर्माण झाला. युरोपने या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. मात्र या अवलंबित्वाचा वापर भविष्यात दबाव आणण्यासाठी केला जाऊ शकतो, हे युरोपच्या लक्षात आले आहे. या अनुभवाचे वर्णन त्यांनी धक्कादायक जाणीव असे केले.
चीनचा थेट उल्लेख न करता त्यांनी, या पद्धतीचा सर्वाधिक फायदा ज्या देशाला झाला आहे, तो देश इथून फार दूर नाही. तो तुम्हा सर्वांना ओळखीचा असलेला शेजारी आहे, अशा शब्दांत त्यांनी चीनवर निशाणा साधला.
‘पंतप्रधान मोदींनी इशारा दिलेला; पण आम्ही ऐकलं नाही’
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी यावेळी भारताच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. त्यांच्या मते, युरोपला ज्या आर्थिक धोक्यांची जाणीव अलीकडे झाली, ते धोके भारताने त्यांच्यापेक्षा आधी ओळखले होते.
“भारताने हे आमच्यापेक्षा आधी पाहिले. त्यांनी आम्हाला इशारा इशारा दिला होता; पण आम्ही ऐकले नाही. आता मात्र आम्ही त्यातून धडा घेत आहोत,” असे डी वेव्हर यांनी सांगितले.
मुक्त व्यापारासोबत राष्ट्रीय हिताचेही संरक्षण
मुक्त व्यापाराला पाठिंबा देतानाच प्रत्येक देशाने आपल्या मूलभूत आर्थिक हितांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही डी वेव्हर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते देशांनी आपल्या महत्त्वाच्या उद्योगांचे आणि आर्थिक क्षमतेचे रक्षण केले तरच मुक्त व्यापाराच्या व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहू शकतो.
भारत-बेल्जियम संबंधांना नवी दिशा
डी वेव्हर २ ते ४ सप्टेंबरदरम्यान भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि बेल्जियमने संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डी वेव्हर यांनी व्यापार आणि गुंतवणूक, महत्त्वाची खनिजे, उच्च तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रांना द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले. जागतिक भू-राजकीय परिस्थिती वेगाने बदलत असताना आणि पुरवठा साखळ्यांमध्ये अनिश्चितता वाढत असताना भारत आणि बेल्जियममधील आर्थिक व धोरणात्मक सहकार्याला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान यांनी व्यापार, गुंतवणूक, महत्त्वाची खनिजे, उच्च तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रांवर भर देत द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यावर सहमती दर्शवली आहे. सध्याच्या काळात जगभरातील भू-राजकीय परिस्थिती वेगाने बदलत असून जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियममधील आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्य दोन्ही देशांसाठी अधिक महत्त्वाचे ठरत आहे.
