पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपी समर्थकाच्या वडिलांची मारहाण करण्यात आली. समर्थक अब्दुल हाफिजचे वडील जनाब माफीक यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात जनाब माफीक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कॉक्रोच जनता पार्टीने या प्रकरणी भाजपावर आरोप केला आहे. मात्र पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींनी मात्र भाजपाचा या सगळ्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका काय म्हणाले?
CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की स्वयंसेवक शेख अब्दुल हाफिज हे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाशी जोडले गेले आहेत. दिल्लीतल्या जंतर-मंतर या ठिकाणी जे आंदोलन झालं त्या आंदोलनात ही अब्दुल हाफीज होते. त्यांच्या वडिलांवर हल्ला करण्यात आला. अब्दुल हाफिज एवढीच मागणी करत होते की पश्चिम बंगालच्या आमच्या जिल्ह्यात सरकारी शाळांची अवस्था सुधारा हीच मागणी केली होती. मात्र अब्दुल हाफिज आणि जनाब माफिक यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात जनाब माफिक हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात भाजपाचा हात असू शकतो असं रांका यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
अभिजीत दिपकेंनी काय म्हटलंय?
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष यांनीही असं म्हटलं आहे की आमच्या पार्टीचे अनेक कार्यकर्ते बंगालला पोहचत आहेत. आम्हाला या प्रकरणात न्याय हवा आहे. आम्ही पीडित कुटुंबाची भेट घेऊ. इन्स्टाग्रामवर मला कायमच विचारलं जातं आहे की आंदोलनाचा जंतर-मंतरवर दुसरा सिझन कधी असणार आहे? मी सांगू इच्छितो लवकरच लवकरच दुसरा सिझन जंतर-मंतरवर दिसेल असंही अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मात्र मारहाण प्रकरणाशी भाजपाचा संबंध नाही असं म्हटलं आहे. संपूर्ण सीजेपी ही आमच्या कार्यकर्त्यासह उभे आहेत. आम्ही सगळे या प्रकरणी सरकारला जाब विचारणा आहोत असंही अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी काय म्हणले?
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी म्हणाले जी घटना घडली ती दुःखद आहे. मात्र या प्रकरणाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. आमच्यावर आरोप केले जात आहेत. पण आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं सुवेंदू अधिकारींनी म्हटलं आहे.
