पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली आहे. पार्थ चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरातून ईडीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि नाणी जप्त केली आहेत. ईडीच्या चौकशीदरम्यान अर्पिताने हे सर्व पैसे पार्थ चॅटर्जींचे असल्याचे मान्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पार्थ चॅटर्जी यांनी निवडणूक आयोगात सादर केलेली प्रतिज्ञापत्रे माध्यमांसमोर आली आहेत. पार्थ चॅटर्जी यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे फक्त १ कोटी ४८ लाख ६७६ रुपये रोख असल्याचे सांगितले होते. तर २०११ च्या निवडणुकीत त्यांच्याकडे केवळ ६३०० रुपये असल्याची माहिती दिली होती.

हेही वाचा- भाजपा उपाध्यक्षांच्या फार्महाऊसमधून स्फोटके आणि शस्त्रे जप्त; मेघालय पोलिसांची कारवाई

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी

कारवाईनंतर पार्थ चॅटर्जी यांची पक्षातून हकालपट्टी

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई सुरू आहे. ईडीच्या चार पथकांनी पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर पुन्हा छापे टाकले आहेत. या दोघांच्याही ठिकाणी ईडी सातत्याने छापे टाकत आहे. पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या अभिनेत्री अर्पिता मुखर्जींच्या दोन घरांमधून ईडीला आतापर्यंत ५५ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच चॅटर्जी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

हेही वाचा- DHFL Yes Bank Case: अविनाश भोसलेंनी लंडनमध्ये ३०० कोटींची संपत्ती खरेदी केली; CBI च्या आरोपपत्रात उल्लेख

२०११ साली त्यांच्याकडे केवळ ६ हजार रुपये होते

आज तकच्या वृत्तानुसार, चौकशीदरम्यान अर्पिता मुखर्जीने जप्त केलेले सर्व पैसे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांचे असल्याचे मान्य केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या पार्थ चॅटर्जीचे कोट्यवधी रुपये रोख असल्याचे सांगितले जात आहे, त्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्र काही वेगळेच सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०११ च्या विधानसभा निवडणुकीत चॅटर्जींनी आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे फक्त ६,३०० रुपये असल्याचे सांगितले होते.
एकूण उत्पन्नाबद्दल बोलले तरी, २०११ मध्ये त्यांनी ११,६४,५५ रुपये एकूण उत्पन्न दाखवले होते.

ईडीकडून तपास सुरु

तसेच २०२१ मध्ये त्यांनी आयटी रिटर्नमध्ये एकूण ५,३९,७२० रुपये उत्पन्न दाखवले. रोख रकमेबद्दल बोलायचे तर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पार्थ चॅटर्जी यांनी त्यांच्याकडे फक्त १,४८,६७६ रुपये असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. एकेकाळी सहा हजार रुपये हातात असणाऱ्या पार्थ चॅटर्जींच्याजवळ एवढी मोठी रक्कम आली कुठून याचाच तपास ईडीकडून सुरु आहे.