बापरे… ओमायक्रॉनवर मात केल्यानंतर डॉक्टरला पुन्हा करोना संसर्ग; बंगळुरुमधील धक्कादायक प्रकरण

करोना चाचणी सकारात्मक येण्याच्या एक दिवस आधीच या डॉक्टरने एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सला उपस्थिती लावली होती.

omicron variant
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वृत्ताला दुजोरा दिलाय (प्रातिनिधिक फोटो)

बंगळुरुमधील एका डॉक्टरने करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गवर मात केली. मात्र त्यानंतर पुन्हा या डॉक्टरला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. ४६ वर्षीय डॉक्टर परदेशामधून नुकताच भारतामध्ये दाखल झाला होता. भारतामधील पहिल्या दोन ओमिक्रॉन बाधित रुग्णांमध्ये या डॉक्टरचा समावेश आहे. या डॉक्टर व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेतून दुबई मार्गे भारतात आलेल्या डोंबिवलीमधील व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली होती.

नक्की पाहा हे फोटो >> ओमायक्रॉन: हिंसाचार, जाळपोळ अन्…; निर्बंधांच्या भितीने अनेक देशांमधील परिस्थिती चिघळली, पण WHO म्हणतंय…

“ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या डॉक्टरला पुन्हा करोनाची लागण झाल्याची बातमी खरी आहे. त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पुन्हा सकारात्मक आलाय,” असं बृह्त बंगळुरु महानगर पालिकेने पीटीआयशी बोलताना सांगितलंय. सध्या या डॉक्टरला विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलं आहे. या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणं दिसत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> चिंता वाढवणारी बातमी! देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित महाराष्ट्रात; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे डॉक्टर एका खासगी रुग्णालयामध्ये काम करतात. २१ नोव्हेंबर रोजी ताप आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर पुढच्या दिवशीच या डॉक्टरची करोना चाचणी सकारात्मक आली. त्यानंतर या डॉक्टरचे स्वॅब सॅम्पल जिनोम सिक्वेन्सींगला पाठवण्यात आले. सीटी व्हॅल्यू कमी आल्यामुळे व्हायरल लोड अधिक असल्याचं लक्षात आल्याने जिनोम सिक्वेन्सींगचा निर्णय घेण्यात आला, असं सांगण्यात आलंय.

नक्की वाचा >> Coronavirus: ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच समोर आली दिलासादायक आकडेवारी; मागील दीड वर्षांमध्ये पहिल्यांदाच…

करोना चाचणी सकारात्मक येण्याच्या एक दिवस आधीच या डॉक्टरने एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सला उपस्थिती लावली होती. १८ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर रोजी ही कॉन्फरन्स होती. या कॉन्फरन्सला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचं कॉनटॅक्ट स्ट्रेसिंगचं काम सध्या महानगरपालिका करत आहे. मात्र या व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग कसा झाला हे ट्रेसिंगदरम्यान समजू शकलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bengaluru doctor recovers from omicron tests covid positive again report scsg

Next Story
१०७ दिवसांनी बांगड्या विकणाऱ्या तस्लीम अलीला जामीन; जमावाकडून मारहाणीनंतर करण्यात आली होती अटक
फोटो गॅलरी