scorecardresearch

भाडेकरु महिलेला वाढदिवसानिमित्त घरमालकाने भेट दिली अंतर्वस्त्रं; पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण

“११ जानेवारी रोजी रात्री तो घराच्या मुख्य गेटवरुन उडी मारुन आला आणि त्याने घराला बाहेरुन टाळा लावला,” असं या महिलेने तक्रारीत म्हटलंय.

Crime News
या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय (प्रातिनिधिक फोटो)

कर्नाटकमधील एका घर मालकाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घरमालकाने भाडेकरु म्हणून राहणाऱ्या महिलेकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शरीरसंबंध ठेव नाहीतर घर खाली कर अशी धमकी घरमालकाने दिल्याचा आरोप महिलेने केलाय. पोलिसांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन घेण्यात आलाय. मात्र या महिलेने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा घरमालकाने केलाय. भाडेकरु महिलेने मुद्दाम आपल्याला या प्रकरणामध्ये अडकवल्याचं घरमालकांचं म्हणणं आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घरमालकाला पोलीस स्थानकात बोलवून त्याची चौकशी केली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पेशाने शिक्षका असणाऱ्या ४२ वर्षीय भाडेकरु महिलेने लावलेल्या आरोपांनुसार घरमालकाने तिला वाढदिवसानिमित्त अंतर्वस्त्रं भेट दिली आणि ती परिधान करुन दाखवं अशी मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच घरमालक असणाऱ्या पद्मनाभ नावाच्या या घरमालकाने या महिलेला बाहेर फिरायला जाण्यासाठीही तिला बळजबरी केल्याचं तक्रारीत म्हटलंय. तसेच घरमालकाने फोनवरुन या महिलेकडे शरीरसंबंध ठेवण्यासंदर्भात विचारपूस केल्याचा उल्लेखही तक्रारीमध्ये आहे. “११ जानेवारी रोजी रात्री तो घराच्या मुख्य गेटवरुन उडी मारुन आला आणि त्याने घराला बाहेरुन टाळा लावला,” असंही या महिलेने म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> ‘ब्रा’च्या साईजमुळे हॉलवरच लग्न मोडतं तेव्हा…; जाणून घ्या नक्की काय घडलं

साऊथ बंगळुरुमधील श्रीनगरमध्ये राहणारी ही महिला शिक्षिका असून तिने १२ जानेवारी रोजी हनुमंतनगर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलीय. आपण त्या घरामध्ये मागील १२ वर्षांपासून राहतोय. पद्मनाभने मला वाढदिवसाच्या दिवशी भेट दिली होती. मला ती एखादी सामान्य भेटवस्तू वाटलेली. पण भेटवस्तू उघडल्यानंतर मला धक्का बसला, असं या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलंय. या प्रकरणामध्ये आयपीसी कलम ४११, ५०४ आणि ३४५ (१)(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नक्की वाचा >> पुणे: त्याच्या मोबाईलमध्ये सापडले ४० हजार Porn Videos; ओळखीच्या महिलांचे फोटो मॉर्फ करुन तयार करायचा अश्लील व्हिडीओ

आपण निर्दोष असल्याचा दावा हा घरमालक करत होता. तसेच त्याने ही महिला मला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिला घर खाली करण्यास सांगितल्याने तिने माझ्यावर हे आरोप केलेत, असा दावा पद्मनाभने केलाय. समोर आलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान घरमालक आणि भाडेकरु महिलेदरम्यान घर खाली करण्यावरुन बऱ्याच काळापासून वाद सुरु असल्याचा खुलासा झालाय. ११ तारखेला पद्मनाभने टाळा लावून पळ काढल्याचा आरोपही खरा असल्याचं तपासात उघड झालंय. आता पोलीस भेट वस्तू देण्याच्या आणि शरीरसंबंध ठेवण्यासंदर्भात विचारणा केल्याच्या आरोपांचा तपास करत असून घरमालक दोषी आठळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bengaluru man gifts tenant innerwear lands in trouble case registered scsg

ताज्या बातम्या