Bengaluru Stampede FIR against RCB, Karnataka State Cricket Association : आयपीएल २०२५ च्या फायनलनंतर आरसीबीच्या विजय उत्सवासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर जमलेल्या नागरिकांमध्ये झालेल्या चेंगराचंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यानंतर आता या चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघ, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA), डीएनए नेटवर्क्स आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Cubbon पार्क पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त (डीसीपी) मध्य शेखर एट टेक्कन्नावर यांनी याची पुष्टी केली आहे. पोलिसांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेत हा गुन्हा नोंदवला असून यामध्ये अनेकांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत. इंडिय टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये कलम १०५ , कलम १२५(१२) (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्ये), कलम १४२ (बेकायदेशीरपणे एकत्र गोळा होणे), कलम १२१ आणि कलम १९० यांचा समावेश आहे.

नेमकं काय झालं होतं?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोक चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जमले होते. या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने बंगळुरू पोलिसांनी आरसीबी संघाचा सत्कार समारंभ हा रविवारी आयोजित करावा असे सुचवले होते, पण कर्नाटक सरकारने हा कार्यक्रम आरसीबी जिंकल्याच्या दुसऱ्याच दिवशी करण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक कमी करण्यासाठी आणि सुरक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून पोलिसांना हा कार्यक्रम रविवारी, म्हणजेच सुट्टीच्या आयोजित करण्याचा सल्ला दिला होता. आरसीबीच्या विजयानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ३ आणि ४ जूनच्या रात्री उशिरापर्यंत काम केले होते. पहाटे ४ वाजेपर्यंत काम केल्यानंतर लगेच अधिकाऱ्यांना त्यांना तैनात करावे लागणार होते. असे असताना देखील सरकारने दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठेवण्याचा आग्रह धरला.