Bengaluru based techie allegedly drove fiancé to suicide : लग्न ठरलं, साखरपुडाही झाला. रोज फोनवर बोलणं सुरू होतं. पण अचानक नवरी मुलगी आत्महत्या करते. आत्महत्येचं कारण देत १२ पानी पत्रही लिहिते. याप्रकरणी नवऱ्या मुलावर आता गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. साखरपुडा ते मुलीची आत्महत्या या काळात नेमकं काय झालं हे धक्कादायक आहे. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
चिन्ना चौक उपनिरिक्षक प्रताप रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत रेहाना (२६)हिने नुकतीच एमएससी पदवी पूर्ण केली होती आणि १५ फेब्रुवारी रोजी तिचा बंगळुरूस्थित तंत्रज्ञ व कडप्पा जिल्ह्यातील प्रोद्दातूरचा रहिवासी असलेल्या शाहनजहानसोबत साखरपुडा झाला होता. तर, ऑगस्टमध्ये त्यांचं लग्न होणार होतं. सुरुवातीला या जोडप्यामध्ये सलोख्याचे संबंध होते. ते रात्री उशीरापर्यंतही फोनवर बोलत होते. मात्र, तीन आठवड्यांपूर्वी या शहजहानच्या वागण्यात अचानक बदल झाला. गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात गेलेली रेहाना बुधवारी कडपा येथील पटेल स्ट्रीटवरील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली.
रेहानाने लिहिली १२ पानी चिठ्ठी
रेहानाने कथितरित्या १२ पानांची एक सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये तिने तिच्या आत्महत्येला शहाजहानला जबाबदार धरले आहे. त्याच्या वागण्यात अचानक बदल झाल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतला. त्या चिठ्ठीत तिने लिहिले, शहाजहानच्या मनात रेहानाविषयी काहीही भावना उरल्या होत्या. त्याला ती अजिबात पसंत नव्हती. तसंच, याआधी त्याच्या चार महिलांसोबत संबंध होते.
रेहानाच्या कुटुंबीयांनी काय आरोप केला?
रेहानाच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की शहाजहानचे वागणे अचानक बदलले आणि त्याने तिच्यावर हे नातेसंबंध संपवण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. त्याने आमच्या मुलीला सांगितले की त्याला दारुचे व्यसन हते आणि त्याच्या अनेक प्रेयसी हत्या. त्याने अशीही तक्रार केली की त्याच्या वडिलांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता आणि रेहानावर लग्न मडण्यासाठी दबाव टाकला. तेव्हा रेहानाने त्याला विचारले की त्याचे वागणे अचानक का बदलले? तेव्हा शाहजहानने आमच्या मुलीला स्पष्टपणे सांगितले की त्याला ती अजिबात आवडत नाही आणि तिच्याबद्दल त्याच्या मनात कोणतीही भावना नाही.
शहाजनहानच्या या वागण्यामुळे आमची मुलगी नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. तिने १२ पानी आत्महत्येचा पत्रात आपला अनुभव सांगितला आहे आणि आमच्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या शहाजनहानला पोलिसांनी शिक्षा करावी, असं आवाहन रेहानाच्या पालकांनी केले.
पोलिसांनी सांगितलं की रेहानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कडपा येथील राजीव गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत हलवण्यात आला आहे. रेहानाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे चिन्ना पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी शाहजहान आणि त्याचे आई-वडील, एम. वीराया आणि एम. वाहिदा यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करून न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
