Workplace Harassment : एका महिलेने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळाबाबत पोस्ट लिहून अशा प्रकारचा वातावरणाचा निषेध नोंदवला आहे. तसंच आता मला माझं करिअर पुन्हा सुरु करायचं आहे असं या महिलेने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ही महिला बंगळुरुची आहे, तिने लिहिलेली रेडइट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

काय आहे महिलेची पोस्ट?

“मित्रांनो, मी एक २५ वर्षीय तरुणी आहे. मी नुकताच माझी नोकरी सोडली आहे. कारण गेले काही महिने नोकरीच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ मी सहन करत होते. एका स्टार्ट अपमध्ये मी प्रॉडक्ट एक्स्पिरियन्स मॅनेजर या पदावर काम करत होते. मात्र मला इतका मानसिक त्रास सहन करावा लागला की मला पॅनिक अटॅक येऊ लागले. त्या ठिकाणी माझा जो मानसिक छळ होत होता त्यामुळे मी माझी नोकरी सोडली. खरंतर अशी सगळी असूनही मला जमतंय तितके महिने मी काम केलं. पण मानसिक छळ थांबला नाही, उलट वाढला. त्यामुळे मी ती नोकरी सोडली.”

Quit to Save My Sanity असं म्हणत या महिलेने पोस्ट लिहिलं आहे

Quit to Save My Sanity असं टायटल देऊन या महिलेने ही पोस्ट लिहिली आहे. जी चांगलीच व्हायरल झाली आहे. मानसिक आरोग्य राखावं म्हणून आणि माझा मानसिक छळ वाढू नये म्हणून मी ही नोकरी सोडली. माझ्या प्रमाणेच माझ्या टीमनेही नोकरी सोडली असं या महिलेने म्हटलं आहे. पुढे ही महिला म्हणते, “मी ती नोकरी सोडून चार महिने झाले आहेत. मी स्वतःला हा वेळ दिला. आता मी नव्याने काम शोधते आहे. मला घरुन काम मिळालं तरीही चालणार आहे किंवा ऑफिसला जावं लागलं तरीही चालणार आहे. पण काम करताना मला मानसिक त्रास नको.” असं या महिलेने म्हटलं आहे. दरम्यान याबाबत या महिलेला अनेक नेटकऱ्यांनी सल्ले दिले आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांनी नेमकं काय म्हटलं आहे या पोस्टबाबत?

तू आधी तुझी मानसिक प्रकृती सांभाळ असं या महिलेला काही युजर्सनी सुचवलं आहे. तर काहींनी आपल्याही कामाच्या ठिकाणी कसे अनुभव आले ते सांगितलं आहे. एका महिलेने सांगितलं की मीही कामाच्या ठिकाणी असाच छळ सहन केला आहे. पाच महिने अत्यंत हाल सहन करत काढले. शेवटी मी तातडीने ही नोकरी सोडून दिली. प्रत्येकाला हे कळणार नाही की एखाद्या कामाच्या ठिकाणी कशा प्रकारे आणि किती मानसिक छळ केला जतो असंही याची कल्पना सगळ्यांना येणार नाही. शेवटी ज्याला सहन कराव लागतो तोच व्यक्त होतो, असंही काही जणांनी महटलं आहे.