पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या साहसी बलिदानाने असंख्य लोकांमध्ये देशभक्तीची ठिणगी पेटली आणि ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जगत आहेत, असं ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९३१ मध्ये जेव्हा ब्रिटीशांनी त्यांना फाशी दिली तेव्हा सिंग केवळ २३ वर्षांचे होते. त्यांच्या आदर्शवादामुळे त्यांच्या बलिदानामुळे ते लोकनायक आणि अनेकांसाठी प्रेरणा बनले.”शूर भगतसिंग प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राहतो. त्यांच्या साहसी बलिदानाने असंख्य लोकांमध्ये देशभक्तीची ठिणगी पेटली. त्यांच्या जयंतीला मी त्यांना नमन करतो आणि त्यांच्या उदात्त आदर्शांची आठवण करतो,” नरेंद्र मोदींनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर एका वेगळ्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी दिग्गज गायिका लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज लता मंगेशकर ९२ वर्षांच्या झाल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आदरणीय लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा मधुर आवाज जगभर गाजत आहे. भारतीय संस्कृतीप्रती त्यांच्या विनम्रतेबद्दल आणि उत्कटतेसाठी त्यांचा आदर केला जातो. वैयक्तिकरित्या, त्यांचे आशीर्वाद हे महान शक्तीचे स्रोत आहेत. मी लता दीदींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो. “

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagat singh lives in the heart of every indian pm modi vsk
First published on: 28-09-2021 at 13:48 IST