Bheema Koregoan Case: वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, आत्मसमर्पणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाची अटही रद्द

वैद्यकीय कारणास्तव वरवरा राव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे

Bheema Koregoan Case: वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, आत्मसमर्पणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाची अटही रद्द
संग्रहित छायाचित्र

सर्वोच्च न्यायालयाने शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी ८४ वर्षीय वरवरा राव यांना जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांना न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कथित आरोपांनंतर वरवरा राव यांना अटक करण्यात आली होती. तीन महिन्यांनंतर आत्मसमर्पण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली अटही सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

वैद्यकीय कारणास्तव कायमस्वरुपी जामीन मिळवण्यासाठी याआधी वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळल्यानंतर राव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. वरवरा राव यांचे वय, ढासळलेले आरोग्य आणि तुरुंगात आत्तापर्यंत घालवलेला अडीच वर्षांचा कालावधी लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने राव यांना जामीन मंजूर केला आहे.

वरवरा राव आरोपी असलेल्या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू झाली नाही. न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले असले तरी अजुन आरोप निश्चित झाले नाहीत, असे निरिक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bheema koregaon case varvara rao got bail from supreme court rvs

Next Story
Video : नितीश कुमार यांचा जुना व्हिडीओ व्हायरल; भर विधानसभेतच राजदला ठणकावून म्हणाले होते, “काहीही झालं तरी…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी