scorecardresearch

Premium

“भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही, म्हणून…”, भूपेश बघेल यांची टीका

“माझी प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं जात आहे”, असा आरोपही बघेल यांनी भाजपावर केला आहे.

bhupesh baghel bjp
भूपेश बघेल यांनी भाजपावर टीका केली आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याला काहीच दिवस उरले असताना, ‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी केला. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले. या दाव्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.

यावर भूपेश बघेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एनडीटीव्ही’ला माहिती देताना बघेल म्हणाले, “भाजपा स्वबळावर निवडणुका लढवू शकत नाही. म्हणून ईडी, इन्कम टॅक्स, डीआरआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जात आहे. माझी प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं होतंय.”

rahul gandhi wayanad election
सीपीआयने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसला वायनाडमधून राहुल गांधीच का हवेत?
sharad pawar review meeting in pune for baramati lok sabha constituency
सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; बारामती लोकसभेची पुण्यात आढावा बैठक
Rahul Gandhi speaks on PM Narendra Modi Caste
Video: ‘पंतप्रधान मोदी ‘ओबीसी’ म्हणून जन्मले नाहीत’, राहुल गांधींनी थेट जातीचा केला उल्लेख
Congress leader Rahul Gandhi accused of grabbing tribal land in the name of development
आदिवासींची जमीन हिसकावण्याचा आरोप

हेही वाचा : अधोविश्व : ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप

“आमच्याच सरकारनं महादेव बेटिंग अ‍ॅपच्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी अनेकांना अटकही केली आहे. घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यासाठी केंद्रासह अन्य राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. पण, केंद्र सरकारनं कुठलीही मदत केली नाही. मुख्य आरोपीला अटक का केली जात नाही?” असा सवालही भूपेश बघेल यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : महादेव ऑनलाइन सट्टा; छत्तीसगडच्या इंजिनिअरने दुबईतून पाच हजार कोटींचा घोटाळा कसा केला?

दरम्यान, ईडीच्या दाव्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या भूपेश बघेल चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. बघेल यांना कथितरीत्या ५०८ कोटी रुपये पोहोचवणाऱ्या असीम दास याच्याकडून पाच कोटी ३९ लाख रुपये जप्त केल्यानंतर ईडीने त्याला अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महादेव अ‍ॅप आणि त्याच्या प्रवर्तकांची सध्या चौकशी चालू आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhupesh baghel attacks bjp over mahadev betting app ed chhattisgarh election 2023 ssa

First published on: 04-11-2023 at 18:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×